लग्न तुटलं, नोकरी सुटली, लाखोंचं कर्ज असताना ‘ही’ महिला कशी झाली कोट्यवधींची मालकीण

पतीने सोडल्यानंतर नोकरी देखील सुटली, लाखोंचं कर्ज, दोन मुलांची जबाबदारी... पूर्णपणे खचलेल्या 'या' महिलेने कसं उभं केलं स्वतःचं राज्य, आज आहे कोट्यवधींची मालकीण... जगतेय रॉयल आयुष्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त महिलेची चर्चा... कोण आहे 'ही'?

लग्न तुटलं, नोकरी सुटली, लाखोंचं कर्ज असताना 'ही' महिला कशी झाली कोट्यवधींची मालकीण
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 10:03 AM

आयुष्यात कोणती परिस्थिती कधी येईल काहीही सांगता येत नाही. एक वेळ अशी येते जेव्हा सर्वकाही संपलं आहे असं वाटू लागतं. अशा परिस्थितीत आपल्या मदतीला कोणी येईल का? असं कायम वाटत राहतं. काय करायला हवं आणि काय करायला नको असं कायम वाटू लागतं. ज्यामुळे आयुष्य पुन्हा योग्य मार्गाने सुरु होईल की नाही असे विचार सतत येक असतात. अशा परिस्थितीत काही लोकं टोकाचं पाऊल उचलतात, तर काही लोकं पुन्हा सर्वकाही सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. असंच काही झालं आहे इंग्लंड येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत.

सध्या ज्या महिलेची चर्चा रंगली आहे, ती महिला दुसरी तिसरी कोणी नाही तर, इंग्लंड येथे राहणाऱ्या लिजा जॉनसन (Lisa Johnson) आहेत. लिजा याचं लग्न तुटलं, नोकरी सुटली, त्यानंतर जुळ्या मुलांची जबाबदारी आणि 36 लाख रुपयांचं कर्ज लिजा यांच्यावर होतं. पण पुढच्या सात वर्षात लिजा यांनी फक्त त्यांचं कर्ज फेडलं नाही तर, 165 कोटी रुपयांच्या मालकीण देखील झाल्या.. आज लिजा प्रायव्हेट जेटने फिरतात.

लिजा म्हणाल्या, ‘त्यांचं बालपण फार गरीबीमध्ये गेलं. त्यांना दुसऱ्यांकडून मिळालेले कपडे घालावे लागत होते. ज्यामुळे अनेकदा त्यांचा अपमान देखील झाला. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी नोकरी सोडली आणि एका कार्यालयात एडमिन असिस्टेंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही पैसे जमा करुन लिजा यांनी वयाच्या 27 व्या वर्षी वकिलीमध्ये शिक्षण पूर्ण केलं.

हे सुद्धा वाचा

लिया यांनी कायदा, बँकिंग आणि मनोरंजन उद्योगात वकील म्हणून यशस्वीपणे काम करण्यास सुरुवात केली. नोकरी करताना लिजा वर्षाला 62 रुपये कमावत होत्या. लग्नानंतर त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर लिजा यांचा घटस्फोट झाला. अशात मुलांसाठी त्यांनी घराजवळ 20 लाख रुपयांची नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

मुलांचा सांभाळ करत असताना लिजा यांची कमाई कमी पडू लागली. पण खर्च दिवसागणिक वाढू लागला होता. अशात लिजा यांच्यावर 36 लाख रुपयांचं कर्ज होतं. अखेर त्यांनी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. या काळात लिजा यांनी प्रत्येक फ्री वेबिनारला जाऊन काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला.

पण लिजा यांच्याकडे कशासाठीही पैसे उरले नव्हते. क्रेडिट कार्डही बंद झाले. यादरम्यान, एके दिवशी लायब्ररीमध्ये त्यांनी व्यावसायिक कल्पनांशी संबंधित एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांना जे काही शिकायला मिळालं ते त्यांना इतरांना शिकवायला सुरुवात केली. त्यांनी पुस्तकेही लिहिली.

2017 पासून, लिसा यांनी त्यांच्या वन टू मनी कोर्स आणि रेस टू रिकरिंग रेव्हेन्यू चॅलेंजद्वारे 50,000 हून अधिक नवोदित उद्योजकांना मदत केली आहे. त्यातील काही आता स्वतः करोडपती बनले आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यानंतर लिसा यांनी फक्त कर्ज फेडलं नाहीतर, आज त्या 165 कोटी रुपयांच्या मालकीण आहेत.

आज लिसा फक्त व्यवसाय करत नाहीत तर, पॉडकास्ट ‘मेकिंग मनी ऑनलाइन’ शो देखील होस्ट करतात. लिसा स्वतःसोबत दुसऱ्यांना देखील पैसे कमावण्याचा मार्ग सांगतात. लिसा म्हणाल्या, पूर्वी मी स्वतःवर खूप पैसे खर्च करायचे. मी माझ्या कुटुंबासह परदेशातही फिरायचे. पण आता मी हळूहळू प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहे. सध्या सर्वत्र लिसा यांच्या प्रवासाची चर्चा सुरु आहे.

Non Stop LIVE Update
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.