MC Stan | ‘कुठे सिद्धार्थ शुक्ला आणि कुठे हा…’; अर्पिता खानच्या ईद पार्टीत एमसी स्टॅन झाला ट्रोल

बिग बॉसचा सिझन संपल्यानंतर एमसी स्टॅनने त्याचं टूर जाहीर केलं. 7 मे रोजी त्याचा हा टूर संपणार आहे. आतापर्यंत त्याने पुणे, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि इंदौरमध्ये परफॉर्म केलंय. यापुढे तो नागपूर, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता आणि दिल्लीत परफॉर्म करणार आहे. 

MC Stan | 'कुठे सिद्धार्थ शुक्ला आणि कुठे हा...'; अर्पिता खानच्या ईद पार्टीत एमसी स्टॅन झाला ट्रोल
MC StanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 12:39 PM

मुंबई : बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा विजेता ठरल्यानंतर रॅपर एमसी स्टॅन घराघरात पोहोचला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली. सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि मेहुणा आयुष शर्मा यांनी आयोजित केलेल्या ईद पार्टीला त्याने शनिवारी हजेरी लावली. रेड कार्पेटवरील त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अर्पिता खानच्या ईद पार्टीत एमसी स्टॅन हा शर्ट, जीन्स, कॅप आणि व्हाइट शूज अशा लूकमध्ये आला होता. तो रेड कार्पेटवर येताच पापाराझींनी फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. पापाराझींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओवर कमेंट करत काहींनी एमसी स्टॅनच्या लूक आणि ॲटिट्यूडचं कौतुक केलं. तर काहींनी त्याच्यावर टीका केली. ‘असं वाटतंय बांबूवर कोणीतरी कपडे सुकवले आहेत’, अशा शब्दांत एकाने खिल्ली उडवली. तर ‘कुठे सिद्धार्थ शुक्ला आणि कुठे हा. लोक म्हणतील की चाळीतून पुढे येऊन हा मुलगा विजेता ठरला आहे. पण चाळीत राहणारा प्रत्येक माणूस हा बिचाराच असतो असं नाही. त्यामुळे त्याला सहानुभूती देणं बंद करा’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

पहा व्हिडीओ

बिग बॉसचा सिझन संपल्यानंतर एमसी स्टॅनने त्याचं टूर जाहीर केलं. 7 मे रोजी त्याचा हा टूर संपणार आहे. आतापर्यंत त्याने पुणे, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि इंदौरमध्ये परफॉर्म केलंय. यापुढे तो नागपूर, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता आणि दिल्लीत परफॉर्म करणार आहे.

‘तडीपार’ आणि ‘इन्सान थे’ हे एसमी स्टॅनचे दोन बॅक टू बॅक अल्बम्स हिट झाले आणि त्यामुळे स्टॅनला प्रचंड लोकप्रियता मिळाली. देसी हिप-हॉपमध्ये त्याने स्वत:ची वेगळी ओळख मिळाली. बिग बॉसमध्ये एमसी स्टॅनचा स्वभाव चाहत्यांना जवळून पाहता आला.

एका आरजेने एमसी स्टॅनला विचारलं की, “दररोज तुझ्या शूजवर आणि हेअरस्टाइलवर किती खर्च करतोस?” त्यावर उत्तर देताना स्टॅन म्हणाला, “दररोज 1 लाख 20 हजार रुपये खर्च होतात. माझी टी-शर्ट 45 हजार रुपयांची आहे.” त्यानंतर स्टॅनला त्याच्या ज्वेलरीची किंमत विचारण्यात आली. तेव्हा तो म्हणाला, ‘दीड’. आरजेने विचारलं की ‘दीड काय? लाख रुपये का?’ त्यावर स्टॅन म्हणतो, “दीड कोटी रुपये”. यानंतर तो पुढे म्हणतो की, “मरण्याआधी सगळं करायचं आहे भावा, फटाफट!”

एमसी स्टॅन अनेकदा इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन त्याची लाइफस्टाइल दाखवतो. एका लाइव्हदरम्यान त्याने चाहत्यांना त्याचे 80 हजार रुपयांचे शूज दाखवले होते. बिग बॉसच्या घरातही त्याने महागडे चेन, कडे आणि सोन्याची अंगठी यांसारखे ज्वेलरी वापरले आहेत. एका एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने रॅपरला त्याच्या ज्वेलरीची किंमत विचारली. तेव्हा स्टॅनने त्याची किंमत जवळपास दीड कोटी रुपये असल्याचं सांगितलं होतं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.