AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनू सूदच्या हॉटेलवर चालेल म्हाडाचा बुलडोझर? अभिनेत्याला नोटीस जारी

अनेकांना संकटातून वाचवणाऱ्या सोनू सूदच्या अडचणीत मोठी वाढ... अभिनेत्याच्या हॉटेलवर चालेल म्हाडाचा बुलडोझर? नक्की प्रकरण काय...

सोनू सूदच्या हॉटेलवर चालेल म्हाडाचा बुलडोझर? अभिनेत्याला नोटीस जारी
| Updated on: Sep 27, 2025 | 8:35 AM
Share

Sonu Sood: अभिनेता सोनू सूद कायम लोकांच्या मदतीला धावतो आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. पण आता अभिनेता स्वतः मोठ्या अडचणीत अडकला आहे. मुंबई अभिनेत्याचं आलिशान हॉटेल आहे. पण त्यावर बुलडोझर चालवला जाऊ शकतो… अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनू सूदच्या हॉटेलला बेकायदेशीर काम हटवण्यासाठी म्हाडाने नोटीस बजावली आहे. “हॉटेल लव्ह अँड लाते”ला म्हाडाने नोटीस बजावली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा येथे असलेले ‘हॉटेल लव्ह अँड लाते’ हे फिल्म अभिनेता सोनू सूद याचं आहे आणि यावेळी अभिनेत्याने स्वतःचा वाढदिवसही तिथेच साजरा केला. सोनू सूदचं ऑफिसही येथेच आहे. हे ‘हॉटेल लव्ह अँड लाते’ वर्सोवा सात बंगल्याच्या आराम नगरमध्ये आहे. म्हाडाने त्यांच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, त्यांनी या हॉटेलमधील बेकायदेशीर कामाबद्दल अनेक नोटिसा बजावल्या होत्या, परंतु कोणतेही पुरावे देण्यात आले नव्हते. सुनावणीदरम्यान अभिनेता न्यायालयात हजर राहिला नाही.

हॉटेलला दिलेल्या नोटीसमध्ये म्हाडाने लिहिले आहे की आपणास दिनांक 18.09. 2025 रोजी सुनावणी करीता नैसर्गिक न्यायसंधी दिली असता सुनावणीस गैरहजर राहिले असल्याने तसंच अद्याप परवानगी विषयक कोणतीही कागदपत्रे या कार्यालयास सादर केलेले नाही. त्यामुळे आपणांस उपरोक्त नमूद ठिकाणी केलेले विनापरवाना बेकायदेशीर वाढीव बांधकाम तत्काल काढून घेऊन सदरची जगा पूर्ववत करणे बाबत आदेशित करण्यात येत आहे.

नोटीसमध्ये असेही लिहिले आहे की आपणंमार्फत सदरचे विनापरवाना बेकायदेशीर वाढीव बांधकाम काढण्यास कसूर केलेली आहे.. असे अस्पष्ट झाल्यास सदरचे वाढीव बांधकाम या कार्यालय मार्फत तातडीने निष्कासित करण्यात येईल. या कामी शासकीय यंत्रणेसह आलेल्या खर्च आपणाकडून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 कलम 53 (6) प्रमाणे जमीन महसुलीची थकबाकी प्रमाणे वसूल करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. हॉटेलला कलम 52 आणि 53 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

अभिनेता सोनू सूद याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळ स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर, कोराना काळात देखील अभिनेत्याने अनेकांची मदत केली.

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.