AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्याने चार मुलांच्या आईकडे केली शरीर सुखाची मागणी, नकार देताच… मीरा रोड परिसरात खळबळ

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका अभिनेत्याने चार मुलांची आई असलेल्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. पण महिलेने नकार देतात भयानक घडल.

अभिनेत्याने चार मुलांच्या आईकडे केली शरीर सुखाची मागणी, नकार देताच... मीरा रोड परिसरात खळबळ
मिरा रोडImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 2:11 PM
Share

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात एका टीव्ही अभिनेत्याने अतिशय धक्कादायक काम केले आहे. त्याने स्वत:च्या घरात काम करणाऱ्या ३७ वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. पण चार मुलांची आई असलेल्या महिलेने नकार देताच तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर फरार झालेल्या अवस्थेत त्याला विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव आशिष मेश्राम आहे आणि तो टीव्ही मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी रात्री मीरा रोड येथील ‘चंद्रेश अकॉर्ड’ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. ललिता (नाव बदलले आहे) या ३७ वर्षीय महिलेची आरोपी आशिष मेश्राम याने गळा, छाती आणि पोटावर चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी तातडीने फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून त्याला अटक केली. सध्या तो ट्रान्झिट रिमांडवर आहे आणि लवकरच मीरा रोड पोलिसांच्या ताब्यात आणला जाणार आहे.

शरीर सुखाची केली मागणी

या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी आशिष मेश्राम गेल्या काही काळापासून ललिता यांच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करत होता. ललिता यांनी त्याची मागणी सातत्याने नाकारली होती. त्यामुळे आरोपीने तिचा वारंवार लैंगिक छळ केला. जानेवारी महिन्यात आरोपीने ललिता यांच्या मुलाला फोन करून धमकी दिली होती की, “तुझ्या आईने माझ्याकडे काम करणे बंद केले किंवा माझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मी तिला जीवे मारून टाकेन.”

या धमकीनंतर ललिता यांच्या मुलाने आशिषला गाठून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हा आरोपी घरी नव्हता. नंतर आरोपीच्या मोठ्या भावाने ललिता यांना आश्वासन दिले होते की, आशिष आता त्या फ्लॅटमध्ये राहत नाही. या आश्वासनावर विश्वास ठेवून ललिता पुन्हा कामावर जाऊ लागल्या होत्या. मात्र, बुधवारी रात्री ललिता कामावर आल्याचे पाहून आरोपीने घरात प्रवेश केला आणि तिची निर्घृण हत्या केली.

मयत महिला कोण होती?

ललिता या काशीमीरा भागात आपल्या पती आणि चार मुलांसोबत राहत होत्या. त्यांचे पती चर्मोद्योगाचे काम करतात. ललिता ८-९ घरांमध्ये घरकाम करून कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळत होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या मेश्राम यांच्या घरी काम करत होत्या. एक मेहनती आणि कष्टाळू महिलेचा अशा रीतीने मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मीरा रोड पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ