सुपर मॉडेल आणि मिस्टर इंडिया प्रतीक जैनचं ‘आलिशान’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण

मार्शल आर्ट्स फायटर ते इन्व्हेस्टमेंट बँकर आणि त्यानंतर मॉडेलिंग असा प्रवास करत मिस्टर इंडिया प्रतीक जैन आता 'आलिशान' ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:22 AM, 1 Jan 2020
सुपर मॉडेल आणि मिस्टर इंडिया प्रतीक जैनचं 'आलिशान'मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण

मुंबई : मार्शल आर्ट्स फायटर ते इन्व्हेस्टमेंट बँकर आणि त्यानंतर मॉडेलिंग असा प्रवास करत मिस्टर इंडिया प्रतीक जैन (Mister India Prateik Jain) आता ‘आलिशान’ ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिणात्या चित्रपटांमध्ये झळकलेला प्रतीक जैन लवकरच ‘आलिशान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

प्रतीक जैन हा बंगळुरुचा आहे. तो मार्शल आर्ट्समध्ये पारंगत आहे. तसेच, इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्याने तीन वर्ष कामसुध्दा केले आहे. बऱ्याच नामांकित ब्रँड्सबरोबर शुटिंग व मॉडेलिंग केल्यानंतर प्रतीकने मिस्टर वर्ल्ड इंडिया 2014 चा विजेताचा किताब पटकावला.

प्रतीक जैनने नुकतंच तेलगू चित्रपट ‘वेंकी मामा’ ह्या चित्रपटातून तेलगू सिनेमात पदार्पण केले. प्रतीकने शाहरुख आणि आलिया भट स्टारर ‘डिअर जिंदगी’ ह्या चित्रपटात कॅमिओ केला होता आणि आता तो बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. ‘आलिशान’ हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असून तो 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.