राम राज्य, 9 टक्के हिंदू आणि भाजपची सत्ता…, मिथुन चक्रवर्तींच्या विधानानंतर चर्चांना उधाण
Mithun Chakraborty on Ram Rajya: मिथुन चक्रवर्ती यांच्या एका विधानानंतर राजकारणात खळबळ, राम राज्य, 9 टक्के हिंदू आणि भाजपची सत्ता स्थापना..., हिंदू मतदारांवर निशाणा साधत वक्तव्य, सध्या सर्वत्र मिथुन दा यांच्या वक्तव्याची चर्चा...

Mithun Chakraborty on Ram Rajya: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी नुकताच पश्चिम बंगाल येथील हिंदू मतदारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जर राज्यात 9 टक्के हिंदू आमच्यासोबत उभे राहिले तर, राम राज्याची स्थापना होईल…’ मिथुन चक्रवर्ती यांनी गेल्या महिन्यात उत्तर 24 परगणामध्येही असंच वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे राजकारण देखील तापलं होतं.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते, ‘राज्यातील लोकांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की, बंगालमध्ये अजूनही 9% हिंदू मतदान करत नाहीत, म्हणून मी त्यांना विनंती करतो की बाहेर या आणि मतदान करा, कारण आपण जिंकलो नाही तर इथे हिंदू बंगाली अडचणीत येतील.’
‘आपल्याला जिंकावं लागणार आहे आणि यामागे फक्त एकच कारण आहे. बांग्लादेशने दाखून दिलं आहे. त्यांच्याकडून आपण धडा घेतला पाहिजे. आम्ही जिंकलो नाही तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू बंगाली टिकणार नाहीत. आपण जिंकलो नाही तर भाजपला पाठिंबा देणारे हिंदू बंगाली सुरक्षित राहणार नाहीत. कारण विरोधक तयार बसले आहेत आणि म्हणत आहेत की पुन्हा सत्तेत आल्यास ते आपला नाश करतील.’ असं देखील मिथुन दा म्हणाले होते.
याआधी देखील मिथुन दा यांनी अनेकदा राजकारणावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘वैयक्तिक विचारसरणी किंवा आवडी-निवडी बाजूला ठेवून भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यावर भर द्या. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही. आपल्याला निवडणूक जिंकायची आहे.’
‘मला हा उमेदवार आवडत नाही, तो उमेदवार मला आवडत नाही… असं बोलणं आता सोडून द्या. सर्वात जास्त गरज आपल्याला जिंकण्याची आहे. सर्वात आधी भाजपच्या उमेदवारांना निवडून आणा. हेच आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे…’ असं देखील म्हणत मिथुन चक्रवर्ती यांनी ममता सरकारवर निशाणा साधला होता.
सांगायचं झालं तर, अभिनेते, राजकारणी मिथुन चक्रवर्ती, जे भारताचे डिस्को-डान्सर म्हणूनही ओळखले जातात, त्यांनी पश्चिम बंगालमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. आता मिथुन दा त्यांच्या सडेतोड वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
