मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाने साधला ऑरीवर निशाणा, ‘त्याच्यासारखी लोकं येतात आणि…’
Mithun Chakrabortys Son : मिथुन चक्रवर्ती यांचा मुगला अभिनेता असून त्याला फार कमी लोकं ओळखतात, पण ऑरी करतो गडगंज कमाई, मिथुन दा यांचा मुलगा ऑरीवर निशाणा साधत म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नमाशी चक्रवर्ती याच्या वक्तव्याची चर्चा...

मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती देखील एक अभिनेता आहे. पण नमाशी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करु शकला नाही. आत नुकताच झालेल्या एक मुलाखतीत नमाशी याने मनातील खंत बोलून दाखवली आहे. एवढंच नाही तर, नमाशी याने ऑरी याच्यावर देखील निशाणा साधला आहे. नमाशी म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये काम करायचं होतं म्हणून अनेक ठिकाणी ऑडिशन दिले. अनेक वर्ष मेहनत केली. तेव्हा कुठे एका सिनेमात काम करण्याची संधी मिळाली…’
‘ऑरी सारख्या लोकांनी प्रसिद्ध आणि लोकप्रियता मिळते हे पाहून विचित्र वाटतं. एक असा व्यक्ती फक्त सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो… अशा लोकांना अधिक लोकप्रियता मिळते. फार कमी वेळात ऑरी सारखी लोकं प्रसिद्धी झोतात येतात.’
पुढे मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी म्हणाला, ‘पापाराझींसमोर स्वतःला एक्सपोझ करण्यासाठी मी अनेक महिने प्रयत्न केले. मी कपडे भाड्यावर घेऊन फोटो क्लिक करायचो. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. मला कधीच कोणतंच काम नाही मिळालं. म्हणून मी सर्वकाही सोडून दिलं…’
‘मी तुम्हाला गेल्या आठवड्याची गोष्ट सांगतो. मी एका ठिकाणी बसलो होतो. तेथे एक व्यक्ती आला आणि मला म्हणाला पोटासाठी तुम्ही काम काय करता. मी त्या व्यक्तीला म्हणालो, मी मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आहे आणि मी अभिनय देखील करतो. व्यक्ती हैराण झाला आणि सोशल मीडियावर शोधू लागला…’
‘पुढे त्याला मला विचारले ऑरी तुझा मित्र आहे का? मला प्रचंड विचित्र वाटलं. मी विचार करु लागलो, तीन वर्ष मी फक्त मेहनत करतोय. हीरो होण्यासाठी प्रचंड कष्ट केले. मी एका मोठ्या स्टारचा मुलगा आहे आणि एक मुलगा फक्त फोटो क्लिक करुन मोठा होतो. तो माझ्यापेक्षा अधिक प्रसिद्ध आहे म्हणून हैराण आहे… मला ऑफी याच्यासारखं प्रसिद्ध व्हायचं आहे. पण असं काम करुन नाही..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नमाशी याची चर्चा रंगली आहे.
कोण आहे ऑरी?
ऑरी याचं पूर्ण नाव ओरहान अवात्रामणी असं आहे. ऑरी याला कायम सेलिब्रिटींसोबत स्पॉट केलं जातं. अनेक स्टारकिड्स यांच्यासोबत ऑरी याची मैत्री आहे. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या खांद्यावर हात ठेऊन ऑरी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतो. ज्यासाठी त्याला पैसे देखील मिळतात. याचा खुलासा खुद्द ऑरी याने अभिनेता सलमान खान याच्याजवळ केला होता.
