Pathaan | ‘पठाण’वरून मनसेचा थिएटर मालकांना आंदोलनाचा इशारा; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

एकीकडे पठाणचे शोज हाऊसफुल असताना दुसरीकडे मनसेनं थिएटर मालकांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. पठाणमुळे मराठी चित्रपटांना शोज मिळत नसल्याची तक्रार मनसेनं केली आहे.

Pathaan | 'पठाण'वरून मनसेचा थिएटर मालकांना आंदोलनाचा इशारा; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 2:07 PM

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आज (25 जानेवारी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. एकीकडे पठाणचे शोज हाऊसफुल असताना दुसरीकडे मनसेनं थिएटर मालकांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. पठाणमुळे मराठी चित्रपटांना शोज मिळत नसल्याची तक्रार मनसेनं केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये पठाणसोबतच मराठी चित्रपटांचेही शोज लावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

काय म्हणाले अमेय खोपकर?

“आम्हाला दर गुरुवारी हा विषय घेऊन आंदोलन करण्याची वेळ येते. महाराष्ट्रात मराठी सिनेमे लावा, या विषयावरून आंदोलन करावं लागणं ही शरमेची बाब आहे. आमचा पठाणला विरोध नाही, शाहरुखचा कमबॅक चित्रपट आहे. तो लोकांनी बघावा हे मान्य. पण त्याच बरोबर चार आठवड्यांपूर्वी रितेश देशमुखचा वेड हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार चालला. त्याने 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. वाळवीलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यानंतर तेजस्विनी पंडित निर्मित बांबू हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. या सिनेमांसाठी स्क्रीन्स आणि थिएटर तर सोडा, पण तिकिट बुकिंगचं काऊंटरदेखील उघडलं नाही,” असं ते म्हणाले.

“मल्टिप्लेक्सना मराठी सिनेमे लावायचेच नाहीत. याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मनसेचे कार्यकर्ते जेव्हा आंदोलन करतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई होते. मग जेव्हा हे मल्टिप्लेक्सवाले बाहेरून इथे येतात, महाराष्ट्रात काम करतात आणि आमच्या महाराष्ट्रात मराठी सिनेमे लावत नाहीत. मराठी सिनेमा लागलाच पाहिजे,” असा आग्रह खोपकरांनी केला.

हे सुद्धा वाचा

मल्टिप्लेक्सच्या मुजोरीबद्दल ते पुढे म्हणाले, “आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही आंदोलन करू. महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्सवाले सरकारकडून कर सवलत आणि इतर सुविधा घेतात. इतर राज्यांमध्ये, साऊथमध्ये या मल्टिप्लेक्सवाल्यांची दादागिरी चालेल का? तिकडचं प्रशासन आणि सरकार सोडा, आधी जनताच उठाव करेल.”

“मराठी सिनेमे चालत नाहीत, असं म्हटलं जातं. पण वेड आणि वाळवी यांसारख्या सिनेमांनी सिद्ध केलंय की मराठी सिनेमेसुद्धा चालतात. इतर सिनेमांना सिद्ध करायला संधी तरी द्या. महाराष्ट्रात मराठी सिनेमांसाठी भीक मागावी लागते. मल्टिप्लेक्सवाल्यांची ही मुजोरी आहे. मी लवकरच मुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांचीही भेट घेणार आहे. त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात....
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात.....
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?.
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र.
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले.