मुंबईची भाषा हिंदी, सब टीव्हीवरील ‘तारक मेहता’चा ‘उल्टा’ प्रताप, मनसेकडून सरळ करण्याचा इशारा

मुंबईची भाषा हिंदी, सब टीव्हीवरील ‘तारक मेहता’चा 'उल्टा' प्रताप, मनसेकडून सरळ करण्याचा इशारा

'हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता' अशा शब्दात अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली (MNS on Tarak Mehta ka Ooltah Chashmah) आहे.

Namrata Patil

|

Mar 03, 2020 | 6:53 PM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही ‘सब टीव्ही;वरील हिंदी मालिका घराघरात लोकप्रिय (MNS on Tarak Mehta ka Ooltah Chashmah) आहे. जेठालाल, बापूजी, टपू, भिडे यासारख्या अनेक कलाकार मंडळींचे किस्से चांगलेच रंजक असतात. काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सदस्य आपपल्या मातृभाषेवरुन वाद घालत असतात. हा वाद बापूजी म्हणजे चंपकलाल यांच्या मध्यस्थीमुळे मिटला. पण त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे रिअल लाईफमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर मुंबईची भाषा हिंदी या विधानवर मनसे, शिवसेनासह भाजप नेत्यांनी टीका केली (MNS on Tarak Mehta ka Ooltah Chashmah) आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोकुलधाम सोसायटीतील सदस्य आपपल्या मातृभाषेतून सुविचार लिहिवा यासाठी भांडत असतात. हा वाद सुरु असताना अचानक बापूजी त्या ठिकाणी येतात आणि या वादावर तोडगा काढतात.

“आपले गोकुलधाम कुठे आहे. मुंबईत…आणि मुंबईची भाषा काय आहे? तर हिंदी. त्यामुळे आपण हिंदीतून सुविचार लिहितो. जर आपले गोकुलधाम चेन्नईत असते तर आपण तामिळ मधून सुविचार लिहिले असते. तसचं जर आपले गोकुलधाम अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये असते तर आपण इंग्रजीतून सुविचार लिहिले असते,” असा एक संवाद बापूजींनी या मालिकेतील भागात म्हटलं (MNS on Tarak Mehta ka Ooltah Chashmah) आहे.

मालिकेतील या संवादाला शिवसेना, मनसेसह भाजपच्या अनेक नेत्यांनी विरोध करत आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.

शालिनी ठाकरेंची टीका

“मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली ‘सुविचार’ लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत! ‘कानाखाली काढलेले मराठी सुविचार’ ह्यांना बरोबर वाचता येतील!!” असे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केली आहे.

अमेय खोपकरांकडून तीव्र संताप

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मालिकेच्या या एपिसोडवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता’ अशा शब्दात अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली (MNS on Tarak Mehta ka Ooltah Chashmah) आहे.

“मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरु असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराथी किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते,” अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

माफी मागा, शिवसेनेची मागणी

तारक मेहता का उल्टा चष्मा या हिंदी मालिकेत मुंबईची भाषा हिंदी या विधानवर शिवसेनेनेही आक्षेप घेतला आहे. “मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. त्यामुळे मालिकेतील अभिनेत्यांनी माफी मागावी,” अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

भाजपकडूनही टीका

“मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबईची भाषा हिंदी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्याने त्यांचे विचार सरळ केले पाहिजे,” अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली (MNS on Tarak Mehta ka Ooltah Chashmah) आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर तारक मेहता या मालिकेचे दिग्दर्शक असित कुमार मोदी यांनीही ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली. मुंबईत महाराष्ट्रात आहे. आपल्या महाराष्ट्राची भाषाही मराठी आहे. यात मलाही जराशीही शंका नाही. मी भारतीय आहे. महाराष्ट्रीयही आहे. गुजरातीही आहे. सर्व भारतीय भाषांचा मला आदर आहे. असे ट्विट असित कुमार मोदी यांनी केले आहे.

चंपक चाचांची जाहीर माफी

तसेच या प्रकरणी चंपक चाचांनी पत्र लिहित जाहीर माफी मागितली आहे. “मुंबईतील भाषा हिंदी नसून मराठी आहे. त्याचा मलाही अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. त्याची माफीपण मागतो. तसेच यापुढे अशी चूक होणार नाही याची मी व्यक्तीश: दखल घेईन,” असे चंपक चाचांनी पत्रात म्हटलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें