AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरोदरपणात अशी आसनं करावीत का? दीपिकाच्या फोटोवर नेटकऱ्यांचा सवाल

अभिनेत्री दीपिका पादुकोण येत्या सप्टेंबर महिन्यात आई होणार आहे. गरोदरपणातील सातव्या महिन्यात तिने योगसाधना करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. गरोदरपणात हे आसन करावं का, असा सवाल काहींनी केला आहे.

गरोदरपणात अशी आसनं करावीत का? दीपिकाच्या फोटोवर नेटकऱ्यांचा सवाल
Deepika Padukone Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 04, 2024 | 10:49 AM
Share

अभिनेत्री दीपिका पादुकोण येत्या सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. प्रेग्नंसीमध्ये दीपिका तिची विशेष काळजी घेत आहे. बुधवारी तिने सोशल मीडियावर योगसाधना करतानाचा फोटो पोस्ट केला. ‘मी चांगलं दिसण्यासाठी नाही तर फिट राहण्यासाठी वर्कआऊट करते’, असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. दीपिकाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दीपिकाचा पती रणवीर सिंह यानेसुद्धा तिच्या पोस्टवर खास कमेंट केली आहे. योगसाधनेचा फोटो पोस्ट करतानाच दीपिकाने त्याचं महत्त्व आणि त्याविषयी इतर सविस्तर माहितीसुद्धा दिली आहे. या फोटोमध्ये दीपिका विपरित करणी आसन करताना दिसतेय.

दीपिकाची पोस्ट-

‘हा सेल्फ केअर महिना आहे. पण जर तुम्ही दररोज सेल्फ-केअरच्या छोट्या छोट्या गोष्टी पाळू शकत असाल तर हा महिना साजरा का करावा? मला चांगला वर्कआऊट आवडतो. मी चांगलं दिसण्यासाठी वर्कआऊट करत नाही तर फिट राहण्यासाठी करते. व्यायाम हा माझ्या लाइफस्टाइलचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण जेव्हा मी वर्कआऊट करू शकत नाही, तेव्हा पाच मिनिटांचं साधं रुटीन फॉलो करते. वर्कआऊट करो अथवा ना करो, हे आसन मी दररोज करते. विमानातील अनेक तासांच्या प्रवासानंतर यामुळे बराच आराम मिळतो’, असं लिहित दीपिकाने नेटकऱ्यांना दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे या पोस्टमध्ये तिने ‘विपरित करणी’ या आसनाविषयी बरीच माहितीसुद्धा दिली आहे.

संस्कृतमध्ये ‘विपरित’ म्हणजे ‘उलटं’ आणि ‘करणी’चा अनुवाद ‘कृती’ असा होतो. भिंतीला पाय टेकवून झोपल्याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला फायदा होऊ शकतो. सध्याच्या तणावपूर्ण आणि व्यग्र वेळापत्रकात मज्जासंस्थेला आराम देण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यापर्यंत या आससानेच अनेक फायदे आहेत.

उठल्यावर/ दिवसाच्या सुरुवातीला:

लिम्फॅटिक आणि ग्लिम्फॅटिक प्रणालींना साथ देते, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. शरीराच्या वरच्या भागात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा प्रवाह करण्यात मदत करते आणि लिम्फॅटिक द्रव प्रवाह उत्तेजित करते. डिटॉक्सिफिकेशन आणि लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये मदत करते.

झोपण्यापूर्वी:

पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते. चांगली झोप लागण्यासाठी विश्रांती मिळते आणि पचन सुधारते. पायांमधील अस्वस्थता दूर करून शांत झोपेस मदत करते.

गरोदरपणात (आधारासाठी बोलस्टर किंवा उशी वापरा) :

स्नायू, सांधे, सुजलेले घोटे आणि पाय यांपासून आराम मिळतो पाठीच्या खालच्या भागावरील दबाव कमी करते आणि पायातील जडपणा दूर करून आराम देते.

कोणी करू नये?

ग्लुकोमा असलेल्यांनी हे आसन करू नये. अनियंत्रित उच्च रक्तदाब असलेल्यांनी हे आसन करू नये

ही आसनं करण्यापूर्वी तुमच्या योग प्रशिक्षकाचा सल्ला अवश्य घ्या.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.