Simmba review: डायलॉग, टाळ्या आणि शिट्ट्या, पैसा वसूल सिम्बा

Simmba review: डायलॉग, टाळ्या आणि शिट्ट्या, पैसा वसूल सिम्बा


Simmba review : जगदीश राजपासून ते आजपर्यंतच्या सगळ्या फिल्मी पोलिस अधिका-यांनी मोठ्या पडद्यावर खाकी वर्दीतल्या अनेक गोष्टी मांडल्या. त्यांचा एक वेगळा रुबाब, एक ऑरा एक वेगळा अंदाज दाखवला जो कदाचित ख-या आयुष्यातल्या पोलिस अधिका-यांच्या नशीबात नसतो..अशीच एका पोलिस अधिकाऱ्याची कथा घेऊन रणवीर सिंग मोठ्या पडद्यावर आला आहे, त्याचा सिम्बा हा सिनेमा घेऊन.

अॅक्शन, रोमान्स, ड्रामाने परिपूर्ण अशा मसालेपटांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी ओळखला जातो. प्रेक्षकांना पैसा वसूल चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळावं, यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करताना दिसतो. असाच फूल ऑन अॅक्शनपट ‘सिम्बा’ हा सिनेमा भेटीला आला आहे.

अजय देवगणने आपला सिंघम अवतार दाखवला होता, मात्र रोहितच्या या नव्या पोलिस अधिकाऱ्यामध्ये फरक एवढाच आहे की हा खडूस नसून मस्त मौला अंदाज वाला आहे. जो जबरदस्त अॅक्शन देखील करतो आणि आपल्या गर्लफ्रेंडसोबत आँख मारुन लव्हस्टोरी देखील.

रणवीर सिंग एका भ्रष्ट पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहे. ज्याच्या आसपास अशा काही घटना घडतात, ज्यामुळे तो भ्रष्ट पोलिस अधिकारी होणं पसंत करतो. शिवगढच्या बाजीराव सिंघमच्याच गावातला हा अनाथ सिंबा म्हणजेच संग्राम भालेराव. सिंबा हा सिंघमसारखा प्रामाणिक पोलिस अधिकारी नसून तो त्याचं भ्रष्टाचारी आयुष्य फुल ऑन मजेत जगत असतो. मात्र अचानक अशी काही घटना घडते ज्याने त्याचं आष्युष्यच बदलून जातं.

सारा अली खान प्रिया बक्षीच्या भूमिकेत आहे.सिम्बा आणि प्रिया यांची लव्हस्टोरी या सिनेमात वेगळं वळण घेते. जेव्हा भ्रष्टाचारी सिम्बाच्या जवळच्या व्यक्तीसोबत विपरीत घडतं तेव्हा सिम्बामधला खरा पोलिस जागा होतो आणि मग पुढे काय होतं यासाठी मात्र सिनेमाच पाहावा लागेल.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बामध्ये रणवीर सिंह, सारा अली खान, सोनू सूद मुख्य भूमिकेत तर आहेत. पण त्यासोबतच सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरुण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, आणि सिध्दार्थ जाधव हे अकरा मराठी कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत.

अतरंगी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रणवीर त्याच्या संवादाने आणि अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांचं पूरेपुर मनोरंजन करतो. दिपीका-रणवीरच्या लग्नानंतर रणवीरचा हा पहिलाच सिनेमा आहे. तसंच सारा अली खानचा केदारनाथ नंतर हा दुसरा सिनेमा असून या सिनेमातही तीने तिच्या अभिनयाने बाजी मारली असं म्हणता येईल.

सिम्बा हा तेलुगु सिनेमा टेम्परचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये ज्युनिअर एनटीआरने मुख्य भूमिका साकारली आहे.

रोहित शेट्टी स्टाईलचे ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘गोलमाल 3’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘सिंघम’ सारखे सिनेमे बॉक्स ऑफीसवर हिट गेल्यानंतर, ‘सिम्बा’ देखील यात स्वतःची जागा बनवण्यासाठी सज्ज झाला आहे. इतकंच नाही तर सिम्बादेखील सिंघमसारखाच पुन्हा पुढच्या काही भागांमध्ये भेटीला येणार आहे, तेव्हा आता बॉक्स ऑफिसवर सिम्बा किती यश मिळवतोय हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरेल.

या सिनेमाला आम्ही देतोय 3 स्टार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI