Special Ops 1.5 Review | ‘हिम्मत सिंह’ची दमदार कथा, ‘रॉ एजंट’ बनून केके मेननने गाजवली सीरीज!
मालिकेची संपूर्ण कथा रॉ एजंट हिम्मत, त्याचा टीम लीडर विजय (आफताब शिवदासानी) आणि मणिंदर यांच्या भोवती फिरते. ‘स्पेशल ऑप्स 1.5’ सीरीजचा हा नवा सीझन हिम्मत सिंग कसा बनला यावर प्रकाश टाकतो...

मुंबई : ‘स्पेशल ऑप्स 1.5 : द हिम्मत स्टोरी’ (Special Ops 1.5 Review) पहिल्या सीझनप्रमाणेच फ्लॅशबॅकमध्ये सेट करण्यात आली आहे. सीरीजची सुरुवात दिल्ली पोलीस अधिकारी अब्बास शेख (विनय पाठक) यांच्या कथनाने होते. ज्यामध्ये ते ‘सरकारी बाबू’ म्हणजेच चड्ढा (परमीत सेठी) आणि बॅनर्जी (काली प्रसाद मुखर्जी) यांना हिम्मतची कथा सांगताना दिसतात.
यानंतर आणखी एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये मणिंदर (आदिल खान) या माजी रॉ एजंटकडे त्याच्याबद्दल संवेदनशील माहिती असल्याची माहितीही समोर येते. मालिकेची संपूर्ण कथा रॉ एजंट हिम्मत, त्याचा टीम लीडर विजय (आफताब शिवदासानी) आणि मणिंदर यांच्या भोवती फिरते. ‘स्पेशल ऑप्स 1.5’ सीरीजचा हा नवा सीझन हिम्मत सिंग कसा बनला यावर प्रकाश टाकतो.
प्रेक्षकांना मागील सीझनशी जोडण्याचा प्रयत्न
नव्या सीझनचा पहिला एपिसोड सुरुवातीपासूनच प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होताना दिसत आहे. मागील सीझनच्या कथेशी प्रेक्षकांना जोडण्यासाठी निर्मात्यांनी पुरेसा फ्लॅशबॅक वापरला आहे. ज्यामध्ये पाहणाऱ्या प्रेक्षकाला पहिल्या सीझनची सतत आठवण करून दिली गेली आहे. यासाठी संसदेवर झालेला हल्ला दाखवण्यात आला आहे. हा 7 वर्ष जुना किस्सा रिवाइंड करताना हिम्मतला एका गूढ रहस्याचा सामना करावा लागतो.
हिम्मतच्या प्रामाणिकपणाची अनुभूती
सीरीजचा पहिलाच भाग हा सर्वोत्तम भाग ठरू शकतो. यातूनच प्रेक्षकांची पसंती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात हिम्मतचा ‘निवृत्ती निधी’ अर्थात ‘रिटायरमेंट फंड’ निश्चित करण्यासाठी ऑडिट केले जात असल्याचे एक दृश्य आहे. यात हिम्मतला नीचा दाखवू इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांचे नकारात्मक मत आहे. पहिल्या सीझन पाहिलेल्या प्रेक्षकांना माहित आहे की, हिम्मत प्रामाणिक, समर्पित आणि खरा देशभक्त आहे, ज्याला देशावरील आपले प्रेम जाहीर करण्यासाठी शब्दांची आवश्यकता नाही. वेळ आल्यावर तो आपले प्रत्येक कर्तव्य पार पाडतो.
कलाकारांचा उत्तम अभिनय
के के मेनन साकारत असलेला एक तरुण RAW एजंट हिम्मत अतिशय हुशार आहे. त्याची प्रत्येक कामगिरी आश्वासक आहे. त्याच्यासोबत आफताब शिवदासानी (अधिकारी विजय कुमार) आहे, जो येथे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसते. या शोमध्ये अभिनेत्री गौतमी कपूर विजयची पत्नी सरोजच्या भूमिकेत आहे. परमीत सेठी आणि केपी मुखर्जी यांनी ऑडीटर म्हणून हिम्मतच्या जीवनात खोलवर शिरण्याचे चांगले काम केले आहे. मणिंदर सिंह आणि ऐश्वर्या सुष्मिताची भूमिका करणारा आदिल खान याची थोडक्यात ओळख झाली आहे.
सीरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये संवादांवर जास्त भर देण्यात आला आहे. यात अॅक्शन सिक्वेन्स जास्त नाहीत. मात्र, यात शार्प वन-लाइनर्सचा पुरेपूर वापर केला गेला आहे. विशेषतः ‘कोई प्रश्न नहीं पूछें, कोई झूठ नहीं सुनें’ अशा प्रकारचे संवाद वापरले गेले आहेत. एकूणच, नीरज पांडे निर्मित या सीरीजचा नवा सीझन प्रेक्षकांना नक्की जागी खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरेल.
हेही वाचा :
‘मला नेहमीच चुकीच्या पद्धतीने सादर केलं गेलं’, लग्न-अफेअर चर्चांवर अखेर नुसरत जहाँनी सोडलं मौन!
आर्यन खान आता रवी सिंहच्या ताब्यात, शाहरुख स्वतःसाठी शोधणार नवा सुरक्षा रक्षक!