AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोलताना जरा भान बाळगा.. झीनत अमान यांच्या लिव्ह-इनच्या कमेंटवर भडकले मुकेश खन्ना

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री असलेल्या झीनत अमान यांनी काही दिवसांपूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपबाबत वक्तव्य केले होते. त्यांचं हे वक्तव्य बऱ्याच जणांना पटलं नाही, काही स्टार्सनी तर पुढे येऊन त्यांच्या विधानाचा निषेधही केला. अभिनेत्री मुमताज यांनीही झीनत अमान यांच्या विधानाचा समाचार घेत टीका केली होती. आता अभिनेते मुकश खन्ना यांनीदेखील झीनत अमान यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अभिनेत्रीच्या जीवनशैलीवरही भाष्य केलं.

बोलताना जरा भान बाळगा.. झीनत अमान यांच्या लिव्ह-इनच्या कमेंटवर भडकले मुकेश खन्ना
झीनत अमान यांच्या लिव्ह-इनच्या कमेंटवर भडकले मुकेश खन्ना
| Updated on: Apr 20, 2024 | 3:07 PM
Share

दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तरुणाईला लिव्ह-इन रिलेशनशिपबाबच सल्ला दिला होता. एकमेकांना नीट समजून घेता यावं यासाठी तसंच नातं मजबूत व्हाव यासाठी लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये रहाव असा सल्ला झीनत अमान यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिला होता. मात्र त्यांच्या या विधानामुळे मोठा गदारोळ माजला. त्यांचं हे वक्तव्य बऱ्याच जणांना पटलं नाही, काही स्टार्सनी तर पुढे येऊन त्यांच्या विधानाचा निषेधही केला. दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनाही लग्न न करता एकत्र राहण्याचा हा सल्ला काही पटला नाही. त्यांनी झीनत अमान यांच्यावर टीका केली. आता ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हेही झीनत अमान यांच्या वक्तव्यामुळे भडकले असून त्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

बोलताना जरा विचार करा की..

मुकेश खन्ना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. झीनत अमान यांच्या या विधानाबद्दल बोलताना मुकेश खन्ना यांनी त्यांच्या जीवनशैलीबद्दल भाष्य केले. अलीकडेच एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी त्यांचं मत मांडलं. झीनत अमान यांच्या जीवनशैलीवर भाष्य करताना ते म्हणाले की , झीनत या सुरुवातीपासूनच पाश्चात्य संस्कृतीनुसार त्यांचे जीवन जगत आहे. पुढे ते म्हणाले की – “आपल्या संस्कृतीत आणि इतिहासात लिव्ह-इन संबंधांना मान्यता नाही. ते वेस्टर्न सिव्हीलायजेशनमधून आलं आहे. झीनत अमान या जे काही बोलल्या आहेत, त्यांनी त्यांच आयुष्य नेहमी वेस्टर्न सिव्हिलायझेशन नुसार जगले आहे. लग्नाशिवाय एक मुलगा आणि मुलगी पती-पत्नी म्हणून एकत्र राहणे मान्य नाही. अस विधाना करताना जरा भान बाळगलं पाहिजे, विचारपूर्वक बोललं पाहिजे”, अशी टीका मुकेश खन्ना यांनी केली.

एवढंच नव्हे तर मुकेश खन्ना यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे होणाऱ्या समस्यांबाबतही चिंता व्यक्त केली. लग्नाआधी मुलगा आणि मुलगी पती-पत्नीसारखे एकत्र राहिले तर त्यांचं काय होईल आणि या काळात त्यांच्याकडून काही चूक झाली तर काय होईल ? असा प्रश्न मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा