Kangana Ranaut | वांद्रे पोलीस स्टेशनमधील FIR रद्द करण्याची मागणी, कंगना हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले

कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती.

  • सुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 16:30 PM, 23 Nov 2020
रिपोर्ट्सनुसार कंगनाच्या लेहंग्याची किंमत 16 लाख रुपये आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आज (23 नोव्हेंबर) वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, यावेळीही कंगना अनुपस्थितीत राहिली आहे. तर, या प्रकरणी आता कंगना हायकोर्टाचे दरवाजे ठोठावत, वांद्रे पोलीस स्टेशनमधील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.  कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स (Third Summons) बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा ‘फायनल अल्टीमेटम’ असून, आताही कंगना अनुपस्थितीत राहिल्याने तिला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे (Mumbai Police Third Summons and Final Ultimatum to kangana Ranaut).

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते. 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा या दोघींनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. यातील एका समन्सला उत्तर देताना त्यांनी घरात लग्न असल्याचे कारण दिले होते. तर दुसऱ्या समन्सला त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता या चौकशीसाठी तरी कंगना आणि तिची बहिणी हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे (Mumbai Police Third Summons and Final Ultimatum to kangana Ranaut).

दोघींनाही तिसऱ्यांदा समन्स

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्यांना पहिला समन्स हा ऑक्टोबर महिन्यात बजावण्यात आला होता. त्यांना अनुक्रमे 26 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी त्या दोघीही चौकशीसाठी आल्या नव्हत्या.

यानंतर त्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसरा समन्स बजावला होता. यात त्यांना 9 आणि 10 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावेळी त्यांनी घरगुती लग्नाचे कारण दिले होते.

पहिला समन्स – 26 आणि 27 ऑक्टोबर

दुसरा समन्स – 9 आणि 10 नोव्हेंबर

तिसरा समन्स – 23 आणि 24 नोव्हेंबर

कंगना विरोधात याचिका दाखल

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात कंगना विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

दिग्दर्शक साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत (Mumbai Police Third Summons and Final Ultimatum to kangana Ranaut).

नेमकं प्रकरण काय?

कंगना रनौत हिने मध्यंतरी बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगना रनौत हिने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. पोलीस कंगना रनौत हिच्यावरोधात तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.

अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते, असेही याचिकेत सांगण्यात आले होते. यानंतर वांद्र न्यायालयाने कंगना रनौत हिच्यावरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

चित्रपट दिग्दर्शक मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. ‘अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते,’ असे या याचिकेत म्हटले होते.

‘कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केलं आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्वीट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाचं नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात,’ असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केला होता.

(Mumbai Police Third Summons and Final Ultimatum to kangana Ranaut)

संबंधित बातम्या : 

Kangana Ranaut | चौकशी होणारच! कंगना रनौतसह बहिण रंगोली चंदेलला वांद्रे पोलिसांची नोटीस

कंगना रनौतला मोठा झटका; न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश