AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉलेजच्या अभ्यासाला कंटाळलेल्या मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, एकदा आई-वडिलांना ऐकवा

‘आई, माझं लग्न जून-जुलैमध्ये लावून दे!’ कॉलेजच्या अभ्यासाला कंटाळलेल्या तरुणीचं मजेशीर राजस्थानी गाणं व्हायरल. गाण्याची सोशल मीडियावर रंगलीय प्रचंड चर्चा.

कॉलेजच्या अभ्यासाला कंटाळलेल्या मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, एकदा आई-वडिलांना ऐकवा
mummy meri shaadi kardo may june july meImage Credit source: Social media
| Updated on: Oct 09, 2026 | 4:49 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक गाणी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. काही जुनी लोकप्रिय गाणी आजही अनेक चाहते सकाळी ऐकताना दिसतात. काही गाण्यांचे सूर मनाला भावतात तर काही गाण्यांचे मजेशीर बोल ऐकून चेहऱ्यावर हसू उमटते. असंच एक भन्नाट राजस्थानी लोकगीत सध्या चर्चेत आलं आहे. कॉलेजच्या अभ्यासाला कंटाळून आईकडे लग्न लावून देण्याची हटके मागणी करणाऱ्या या गाण्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘मम्मी, मेरी शादी करदो जून या जुलाई में’ असे या गाण्याचे मजेशीर बोल आहेत. कॉलेजच्या अभ्यासात मन लागत नसल्याने लग्न करून देण्याचा हट्ट या गाण्यातून व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, लग्नासाठी जून किंवा जुलै या महिन्यांचीच निवड करण्यात आली आहे. गाण्याची गंमतीशीर शैली आणि बोलचालीतील भाषा यामुळे ते अनेकांना भावत आहे.

आईपासून काका-काकूंपर्यंत सगळ्यांकडे लग्नासाठी हट्ट!

या गाण्यात केवळ आईकडेच नाही तर वडील, ताऊ, काका-काकू, बहीण आणि दाजींकडेही लग्न लावून देण्यासाठी शिफारस करण्याची विनंती केली आहे. कॉलेजच्या अभ्यासापासून सुटका मिळावी आणि लवकर लग्न व्हावे अशी या गाण्यातील व्यक्तीची इच्छा आहे. या हटके कल्पनेमुळे गाण्याला विनोदी रंग आला आहे.

चेतना शर्मा यांच्या आवाजातील गाणे

हे राजस्थानी गाणे चेतना शर्मा यांनी गायले आहे. गाण्याचे संगीत अशोक कुमार बब्बू यांनी दिले असून, त्याचे बोल सुनीता पांचाल यांनी लिहिले आहेत. हे गाणे सात गाण्यांचा समावेश असलेल्या एका अल्बमचा भाग आहे. डिजिटल म्युझिक प्लॅटफॉर्मवर हा अल्बम 29 मे 2025 रोजी प्रदर्शित झाला होता.

सोशल मीडियावरही गाण्याची चर्चा

या गाण्याचे विविध व्हिडीओ यूट्यूब आणि सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. गाण्याच्या मजेशीर बोलांमुळे त्यावर रील्स बनवल्या जात आहेत. लग्नसमारंभ आणि मित्रमंडळींच्या कार्यक्रमांमध्येही अशा प्रकारची गाणी वातावरणात रंगत आणतात.

दरम्यान कॉलेजच्या अभ्यासाला कंटाळून आईकडे लग्नासाठी हट्ट करणाऱ्या या राजस्थानी गाण्याची हटके संकल्पना आणि विनोदी अंदाज यामुळे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र