AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naga Chaitanya | नाग चैतन्यचं दुसऱ्यांदा लग्न? अखेर चर्चांनंतर महत्त्वपूर्ण माहिती समोर

अभिनेता नाग चैतन्य दुसऱ्यांना विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. समंथा घटस्फोट दिल्याच्या दोन वर्षांनंतर तो दुसऱ्यांदा संसार थाटण्यास सज्ज असल्याची चर्चा आहे. त्यावर आता त्याच्या जवळच्या सूत्रांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Naga Chaitanya | नाग चैतन्यचं दुसऱ्यांदा लग्न? अखेर चर्चांनंतर महत्त्वपूर्ण माहिती समोर
Naga ChaitanyaImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2023 | 11:29 AM
Share

हैदराबाद | 16 सप्टेंबर 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी जेव्हा घटस्फोट जाहीर केला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. लग्नाच्या चार वर्षांतच ही जोडी विभक्त झाली. त्यानंतर समंथा तिच्या करिअर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. तर नाग चैतन्यचं नाव ‘मेड इन हेवन’ फेम अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं गेलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नाग चैतन्य एका मोठ्या बिझनेसमनच्या मुलीशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता त्याच्या जवळच्या सूत्रांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

बिझनेसमनच्या मुलीशी लग्न?

नाग चैतन्य आणि समंथा ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 2017 मध्ये या दोघांनी गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच दोघं विभक्त झाले. 2021 मध्ये नाग चैतन्य आणि समंथाने घटस्फोट जाहीर केला. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर आता नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्यास सज्ज असल्याची चर्चा सुरू झाली. गेल्या काही महिन्यांपासून त्याचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं जात होतं. मात्र नाग चैतन्यचं दुसरं लग्न सोभिताशी होणार नसून त्याच्या या दुसऱ्या लग्नाची प्लॅनिंग वडील नागार्जुन करत आहेत, असं म्हटलं गेलं. नागार्जुन यांनी मुलासाठी एका मोठ्या बिझनेसमनच्या मुलीला पसंत केलं आहे. तिचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही, अशी चर्चा होती.

चर्चांमागील सत्य

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, नाग चैतन्यच्या दुसऱ्याच्या लग्नाच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत. त्याच्या जवळच्या सूत्रांनी याबद्दलची खात्रीलायक माहिती दिली आहे. “नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा खोट्या आहेत. एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत ही फेक न्यूज अचानक पसरवली जात आहे. पण त्यात काहीच तथ्य नाही”, असं त्यांनी म्हटलंय.

नाग चैतन्य आणि सोभिताला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर त्याने सोभिताला नवीन घर दाखवण्यासाठीही नेलं होतं. त्याचवेळी त्याने तिची आईवडिलांशी भेट करून दिली. मात्र डेटिंगबद्दल अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही दोघं चांगले मित्र आहोत, असंच दोघंजण म्हणत आले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.