Nana Patekar Passes Away : तुम्ही माझे आवडते हिरो आहात, पण.. राज कपूर सारख्या महान दिग्दर्शकाचा चित्रपट नाकारताना नाना पाटेकरांनी दाखवलेला स्पष्टवक्तेपणा
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या नाना पाटेकरांनी अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे त्यांनी दिग्दर्शक राज कपूर यांची चित्रपटाची ऑफर नाकारली होती.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं (Nana Patekar) आज ( गुरूवार, 8 ऑक्टोबर) निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने प्रत्येक जण हळहळला. चित्रपटसृष्टीवर तर मोठी शोककळा पसरली. पंतप्रधान मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी यांनी नानांच्या जाण्याबदल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. नानांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा मल्हार असा परिवर आहे. त्यांच्यावर आज पुण्यातील डोनजे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या अनेक दशकांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या नाना पाटेकरांनी अनेक चित्रपटांत काम केलं. अंकुश, प्रहार, खामोशी, तृषाग्नि, आवाम, प्रतिघात, क्रांतीवीर, परिंदा, तिरंगा, अब तक छप्पन, वेलकम यांसारख्या चित्रपट खूप गाजले आणि त्यांनी नान यांना मोठी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचा दमदार अभिनयामुळे त्यांचे लोखा चाहते असून नानांच्या जाण्याने सर्वच हळहळले. या मोठ्या अभिनेत्याल एकदा विख्यात अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती, पण त्यांनी ती नाकारली. खुद्द नानांनीच याबद्दल सांगितलं होतं, जाणून घेऊया.
राज कपूर यांनी दिलेली भूमिका नाना पाटेकरांनी का नाकारली ?
अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि स्पष्टवक्तेपणाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्यांच्या कारकिर्दीत अशी एक संधी आली होती, जी त्यांनी स्वतःहून नाकारली—आणि ती संधी साधीसुधी नव्हती. ती थेट हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांनी दिली होती. डिसेंबर 2024 मध्ये PTI ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी या आठवणीला उजाळा दिला. त्यांनी सांगितलं की, ते एकदा आर. के. स्टुडिओमध्ये शूटिंग करत असताना राज कपूर यांनी त्यांना आपल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. ” तू माझ्या चित्रपटात काम करशील का?” असं राज कपूर यांनी मला विचारलं, असं नाना म्हणाले.
थेट दिला नकार
त्या क्षणी नाना पाटेकर यांना मोठा आनंद झाला. कारण राज कपूर हे त्यांच्यासाठी केवळ एक दिग्गज कलाकार नव्हते, तर त्यांच्या कुटुंबासाठीही ते अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. विशेषतः नानांच्या आई-वडिलांच्या पिढीसाठी राज कपूर हे आवडते नायक होते. त्यामुळे त्यांच्या मनात राज कपूरांविषयी प्रचंड आदर आणि आपुलकी होती. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना पाटेकर यांनी या ऑफरला होकार दिला नाही. त्यांनी चक्क ती ऑफर नाकारली.
ऑफर नाकारण्याचं कारण काय ?
याबद्दल बोलताना पुढे नानांनी सांगितलं की माझ्या मनात एक वेगळीच भीती होती. जर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एखाद्या दृश्याबाबत माझं आणि राज कपूर यांचं मत वेगळं झालं, तर ते राज कपूर यांच्याशी त्या विषयावर मोकळेपणाने चर्चा करू शकणार नाहीत, असं वाटत होतं, असं नानांनी नमूद केलं. यामागचं कारणही त्यांनी अतिशय स्पष्ट केलं.
नाना पाटेकरांनी राज कपूर यांना सांगितलं की, “ माझ्या घरात तुम्ही सगळ्यांचे आवडते हिरो आहात—अगदी माझ्या आई-वडिलांसह सगळ्यांना तुम्ही प्रचंड आवडता. काम करत असताना जर एखाद्या सीनबाबत आपलं मत वेगळं झालं, तर मी ते तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. आणि मी जर काही बोललो, तर मी तुमचा अपमान करतोय, असं मला असं वाटेल.” असं म्हणत त्यांनी राज कपूर यांची ऑफर नाकारत काम करू शकत नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं.
