AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar Passes Away : नाना पाटेकरांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का; सलमान खानचा मोठा निर्णय

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला.

Nana Patekar Passes Away  : नाना पाटेकरांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का; सलमान खानचा मोठा निर्णय
| Updated on: Oct 08, 2026 | 8:02 PM
Share

हिंदी आणि मराठी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या दिग्गज अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने मोठा निर्णय घेतला. मुंबईत गुरुवारी आयोजित करण्यात आलेला आपला एक महत्त्वाचा कार्यक्रम सलमानने रद्द केला.  सलमान खान आणि नाना पाटेकर यांचे जुने आणि विशेष नाते होते. दोघांनी 1996 मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘ खामोशी: द म्युझिकल ’ या गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केलं होते. नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडालेली असताना, त्यांच्या सन्मानार्थ सलमान खानने कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

इव्हेंट कॅन्सल करण्याचा निर्णय

गुरुवारी मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जीबी रिॲल्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य कार्यक्रमाला सलमान खान उपस्थित राहणार होता. कार्यक्रमाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर वातावरण बदलले. दिवंगत अभिनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती तसेच चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी सलमान खान आणि आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.

‘खामोशी’ची लक्षात राहणारी केमिस्ट्री

सलमान खान आणि नाना पाटेकर यांनी 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘खामोशी: द म्युझिकल’ या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी मनीषा कोईराला साकारलेल्या ‘ॲनी’च्या मूक-बधिर वडिलांची, ‘जोसेफ’ची भूमिका साकारली होती. तर सलमान खानने ‘राज’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात सीमा बिस्वास यांचीही महत्त्वाची भूमिका होती.

‘खामोशी: द म्युझिकल’ हा संजय लीला भन्साळी यांच्या सुरुवातीच्या आणि उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानला जातो. चित्रपटातील भावनिक कथानकासोबतच नाना पाटेकर आणि सलमान खान यांच्या अभिनयाचेही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं होतं. नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान आणि प्रभावी अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या दमदार अभिनयाची आणि अविस्मरणीय भूमिकांची आठवण कायम चाहत्यांच्या मनात राहील.

गोव्यात नाना पाटेकर यांचे निधन

नाना पाटेकर यांचे गुरूवारी निधन झाले. गोव्यातील निवासस्थानी त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.  काही दिवसांपूर्वीच ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. 4 ऑक्टोबर रोजी गोव्यातील डोना पाउला येथे आयोजित सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या इन्स्टॉलेशन समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी झाले होते.

Follow Us
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं