AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नाना पाटेकरांचं जाणं धक्कादायक! 15 ट्रायसेप डिप्स सहजपणे करायचे, फिटनेसच्या धुरंधरांनाही द्यायचे टक्कर, व्हिडीओ चर्चेत

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या वर्कआऊटचा हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. गोव्यात कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं. अतुल कसबेकर यांनी नानांचा हा व्हिडीओ पोस्ट केला होता.

Nana Patekar: नाना पाटेकरांचं जाणं धक्कादायक! 15 ट्रायसेप डिप्स सहजपणे करायचे, फिटनेसच्या धुरंधरांनाही द्यायचे टक्कर, व्हिडीओ चर्चेत
नाना पाटेकरImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2026 | 11:30 AM
Share

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 75व्या वर्षी गोव्यात कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी नाना पाटेकर यांच्या जबरदस्त फिटनेसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वयाच्या 75व्या वर्षीही ते अत्यंत सहजपणे कठीण व्यायाम करताना दिसले होते. आता त्यांच्या निधनानंतर हाच व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. नाना पाटेकर यांची ओळख केवळ त्यांच्या दमदार अभिनयामुळेच नव्हे, तर त्यांच्या साध्या राहणीमानामुळेही होती. मात्र, त्यांच्या फिटनेसकडेही अनेकांचं लक्ष गेलं होतं. फोटोग्राफर आणि निर्माते अतुल कसबेकर यांनी नाना पाटेकर यांचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये नाना ट्रायसेप डिप्स करताना दिसत होते.

साध्या पोशाखात, गळ्यात गमछा आणि चेहऱ्यावर कोणताही ताण नसताना नाना पाटेकर एकापाठोपाठ एक डिप्स करत होते. विशेष म्हणजे त्यांनी 15 ट्रायसेप डिप्स पूर्ण केल्याचं सांगण्यात आलं होतं. हा व्यायाम करताना त्यांच्या हालचालींमध्ये कमालीचा आत्मविश्वास आणि सहजता दिसत होती. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी अक्षरशः थक्क झाले होते. अतुल कसबेकर यांनीही नानांच्या फिटनेसचं कौतुक करत त्यांना आपले फिटनेस गोल्स बदलणारे व्यक्तिमत्त्व म्हटलं होतं. या व्हिडीओवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. चाहत्यांनी नानांना फिटनेससाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं होतं. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेही त्यांच्या वर्कआऊटवर कौतुकाची प्रतिक्रिया दिली होती.

पहा व्हिडीओ-

नानांचा हा व्हिडीओ त्यावेळी त्यांच्या फिटनेससाठी चर्चेत आला होता. मात्र आता त्यांच्या निधनानंतर त्याच व्हिडीओला वेगळाच भावनिक संदर्भ मिळाला आहे. इतक्या वयातही व्यायामाच्या बाबतीत सक्रिय आणि फिट दिसणारे नाना पाटेकर अचानक कार्डिअॅक अरेस्टने गेल्याने चाहतेही सुन्न झाले आहेत. त्यांच्या निधनाचं कारण कार्डिअॅक अरेस्ट असल्याची माहिती समोर आली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी आज सकाळी रोजी समोर आली. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास 45 मिनिटे सीपीआर देऊनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीचा हा फिटनेस व्हिडीओ आता पुन्हा सोशल मीडियावर वेगाने शेअर होत आहे.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा