AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या निधनानंतर गोवा पोलिसांनी उचललं मोठं पाऊल; कुटुंबीयांचे जबाब घेणार अन्..

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीने एक प्रभावी अभिनेता गमावला आहे. आपल्या दमदार अभिनयाने, वेगळ्या संवादफेकीने आणि विविधांगी भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं.

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या निधनानंतर गोवा पोलिसांनी उचललं मोठं पाऊल; कुटुंबीयांचे जबाब घेणार अन्..
Nana PatekarImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2026 | 8:05 AM
Share

Nana Patekar: बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी पहाटे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आलं नाही. त्यांच्या निधनानंतर आता गोवा पोलिसांनी या प्रकरणात अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरू

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गोवा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्या निधनप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 194 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक करत आहेत. मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पावला परिसरातील ओशन पार्क इथून मणिपाल रुग्णालयात आणण्यात आलं होतं. रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणात वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मृत्यूचं नेमकं कारण निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे.

या तपासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवणे. निधनापूर्वी त्यांची प्रकृती कशी होती, त्यांना काही त्रास जाणवत होता का आणि मृत्यूपूर्वी नेमक्या कोणत्या घटना घडल्या, यासंबंधी माहिती पोलिसांकडून घेतली जाणार आहे. याशिवाय, संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून उपलब्ध माहितीची पडताळणी केली जाणार आहे. निधनाचं कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रियाही महत्त्वाची ठरली. या प्रक्रियेतून मिळणारे निष्कर्ष आणि पोलिसांच्या तपासातून समोर येणारी माहिती यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल.

नाना पाटेकर यांच्या निधनाबाबत सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याची माहिती समोर आली होती. मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले, मात्र यश मिळालं नाही. नाना पाटेकर हे हृदयविकाराशी संबंधित समस्यांसाठी औषधे घेत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली होती. मात्र, निधनाचं नेमकं वैद्यकीय कारण निश्चित करण्यासाठी तपासणी आणि वैद्यकीय निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे.

पोलिसांच्या तपासात नाना पाटेकर यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचं स्पष्ट झाल्यास हे प्रकरण नियमानुसार बंद केलं जाऊ शकतं. मात्र, तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी किंवा अन्य पुरावे समोर आल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे तपासातून नेमकं काय समोर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच