AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: ..तर नाना पाटेकरांचा जीव वाचला असता; कायम राहील या एका गोष्टीचा पश्चात्ताप

Nana Patekar: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं पहाटे 5.20 वाजताच्या सुमारास निधन झालं. त्यांनी मध्यरात्रीच मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं होतं. त्यांना जवळपास 45 मिनिटं सीपीआर देण्यात आला होता.

Nana Patekar: ..तर नाना पाटेकरांचा जीव वाचला असता; कायम राहील या एका गोष्टीचा पश्चात्ताप
Nana PatekarImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2026 | 1:58 PM
Share

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 75व्या वर्षी गोव्यातील आपल्या घरी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. निधनाच्या काही तास आधी त्यांनी रात्री सुमारे 2.30 वाजता आपल्या मित्राला मेसेज करून तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं होतं. मात्र रात्रीची वेळ असल्याने मित्राच्या नजरेस हा मेसेज लगेच पडला नाही. त्यानंतर घडलेल्या घटनांनी नानांच्या अखेरच्या काही तासांची कहाणी अधिकच अस्वस्थ करणारी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी मित्राला पाठवलेल्या मेसेजमध्ये अस्वस्थ वाटत असल्याचं आणि शरीराच्या डाव्या बाजूला दुखत असल्याचं कळवलं होतं. मदतीची गरज असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे या मेसेजमधून सांगितलं होतं. मात्र तो मेसेज त्यावेळी वाचला गेला नाही. पहाटेच्या सुमारास मित्राला जाग आल्यानंतर त्याने नानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि तातडीने त्यांच्या गोव्यातील घरी जाण्याचा निर्णय घेतला.

मित्र साधारण पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नानांच्या घरी पोहोचला. त्यावेळी नानांची प्रकृती गंभीर झाल्याचं दिसून आलं. ते प्रचंड घामाघूम झाले होते आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत होती. परिस्थिती लक्षात येताच केअरटेकरच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. नानांना रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू झाली. दरम्यान, वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यावेळी नाना प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी तातडीने सीपीआर सुरू केला. रुग्णवाहिकेतून त्यांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं. पहाटे साधारण 4.20 ते 4.30 वाजताच्या सुमारास ते रुग्णालयात पोहोचले.

रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जवळपास 45 मिनिटे त्यांना सीपीआर आणि कार्डिअॅक मसाज करण्यात आला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही आणि पहाटे सुमारे 5.20 वाजता नाना पाटेकर यांना मृत घोषित करण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या मृत्यूचं कारण कार्डिअॅक अरेस्ट असल्याचं सांगण्यात आलं आहे. नाना पाटेकर यांना लवकर वैद्यकीय मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते, असं म्हटलं जात आहे.

रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अखेरच्या तासांबाबत समोर आलेली ही माहिती चाहत्यांसाठी अत्यंत भावूक करणारी ठरत आहे.

Follow Us
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया