AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेजर चौहान बनलेले नाना पाटेकर, निदर्यीपणे गुंडांचा खातमा करतात, माधुरीचा तो सिनेमा आठवतोय..

ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्या जीवनावर बेतलेला 'प्रहार' नावाचा एक सिनेमा येत आहे.परंतू त्याआधी साल १९९१ मध्ये 'प्रहार: द फाइनल अटॅक' नावाचा नाना पाटेकर यांचा देखील एक सिनेमा आलेला होता.

मेजर चौहान बनलेले नाना पाटेकर, निदर्यीपणे गुंडांचा खातमा करतात, माधुरीचा तो सिनेमा आठवतोय..
'Prahaar' starring Nana Patekar and Madhuri Dixit
| Updated on: Oct 08, 2026 | 8:10 PM
Share

अभिनेते नाना पाटेकर यांचे अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नानांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित सोबत केलेला ‘प्रहार’ सिनेमा तुम्ही पाहिलाय का ? या चित्रपटात नाना मेजर प्रताप चौहान बनलेले असतात. या चित्रपटात माधुरी दीक्षित यांनी गौतम जोगळेकर यांच्या सोबत अभिनय केला होता. या सिनेमाला फारसे व्यावसायिक यश मिळालेले नव्हते. या चित्रपटाची कहानी वेगळीच होती. अभिनेत्री माधुर दीक्षित यांना नाना यांना इंस्टाग्राम अकाऊंटवर श्रद्धांजली वाहिली आहे. कसा होता हा चित्रपट वाचूयात…

या चित्रपटाची कथा मेजर प्रताप चौहान यांच्याभोवती फिरत असते. या चित्रपटात ते भारतीय सैन्यातील अत्यंत कडक, शिस्तप्रिय असे कमांडो ट्रेनर दाखवले आहेत. पीटर डिसूझा ( गौतम जोगळेकर ) हा एक कोमल संवेदनशील मनाचा मुलगा सैन्यात भरती होतो. मेजर चौहान पीटर डिसुझा याला अत्यंत कठोर ट्रेनिंग देऊन एक सक्षम कमांडो म्हणून तयार करतात. एका बचाव मोहिमेदरम्यान अतिरेक्यांशी लढताना पीटर गंभीर जखमी होऊन जायबंदी झाल्याने त्याला सैन्यातून निवृत्ती घ्यावी लागते.

मेजर चौहान हे पीटरला भेटण्यासाठी मुंबईत येतात, तेव्हा त्यांना कळते की पीटरची स्थानिक गुंडांनी हत्या केली आहे. जो सैनिक सीमेवर देशाच्या शत्रूंशी लढला, त्याला आपल्याच देशातील काही गुंडांनी संपवले याचा मेजर चौहान यांना मोठा हादरा बसतो. ते पीटरच्या वडिलांना मदतीचा हात देऊ करतात. तिथेच राहून त्यांना आधार द्यावा अशी त्यांची इच्छा असते. तिथे, पीटरची प्रेयसी वाग्दत्त वधू शर्ली ( माधुरी दीक्षित ) हिच्याशी मेजर चौहान यांची भेट होते. त्या गल्लीतील एका किरण ( डिंम्पल ) या विधवेच्या घरीत ते राहातात. पीटरच्या हत्येचे त्याच्या वडिलांसह अनेक नागरिक साक्षीदार असतानाही गुंडांना घाबरुन कोणीही कोर्टात साक्ष द्यायला तयार नसते.. दरम्यान मेजर प्रतात चौहान याला राहाण्यास जागा दिली म्हणून स्थानिक गुंड किरणच्या घरावर हल्ला करतात. त्यामुळे मेजर प्रताप चौहान संतापून या स्थानिक गुंडांचा बदला घेतात आणि त्यांना नष्ट करतात अशी या चित्रपटाची कथा आहे.

Follow Us
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल