AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: परवा तासभर गप्पा मारल्या अन्..; नाना पाटेकरांच्या निधनाने मानलेली बहीण भावूक

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांची मानलेली बहीण संपदा नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत जवळपास तासभर गप्पा मारल्या होत्या.

Nana Patekar: परवा तासभर गप्पा मारल्या अन्..; नाना पाटेकरांच्या निधनाने मानलेली बहीण भावूक
नाना पाटेकर यांची मानलेली बहीण संपदा नाईकImage Credit source: Tv9
| Updated on: Oct 08, 2026 | 12:53 PM
Share

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 75व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं. नानांच्या निधनानंतर त्यांच्या जवळच्या व्यक्ती, मित्र आणि सहकलाकारांकडून आठवणींना उजाळा दिला जात आहे. नाना पाटेकर यांची मानलेली बहीण संपदा नाईक यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना नानांसोबतच्या शेवटच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या. अवघ्या दोन दिवसांपूर्वी नानांना भेटले होते, तेव्हा त्यांना कोणताही त्रास जाणवला नव्हता, असं त्यांनी सांगितलं. संपदा नाईक यांनी सांगितलं की, सकाळी साधारण सात वाजता त्यांनी सहज फेसबुक अकाऊंट उघडलं आणि नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी पाहिली. ही बातमी पाहून त्यांना मोठा धक्का बसला. वृत्त खरं आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांनी तातडीने नानांचा मानलेला मुलगा अमेय याला मेसेज केला. “हे खरं आहे का?” असा प्रश्न त्यांनी त्याला विचारला.

नानांच्या निधनाची बातमी त्यांच्यासाठी इतकी अनपेक्षित होती, कारण अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्यांची नानांसोबत भेट झाली होती. संपदा नाईक नानांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी दोघांनी जवळपास तासभर मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे, त्या भेटीत नानांनी त्यांच्या मुलाला सोबत घेऊन येण्यास सांगितलं होतं. “मुलाला घेऊन ये, मला त्याला भेटायचं आहे,” असं नाना म्हणाले होते. त्यामुळे संपदा नाईक आपल्या मुलाला घेऊन त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.

नाना पाटेकर सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या कार्यक्रमासाठी गोव्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं गोव्यात येणं झालं होतं. संपदा नाईक यांनी सांगितलं की, नानांचं गोव्यात स्वतःचं घर आहे आणि ते अधूनमधून इथे येत असत. गोव्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. त्यामुळे गोव्यात आल्यानंतर ते आपल्या परिचितांशी आणि मित्रमंडळींशी आवर्जून संपर्क साधत असत.

इतकंच नाही, तर दोन दिवसांपूर्वी त्यांचं नानांशी फोनवरही बोलणं झालं होतं. गोव्यातील नवीन प्रोजेक्ट्सबाबत नाना त्यांच्याकडे विचारणा करत असत. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याची बातमी ऐकून विश्वासच बसत नसल्याचं संपदा नाईक यांनी म्हटलंय. शेवटच्या भेटीची आठवण सांगताना त्या म्हणाल्या की, नानांना कोणताही त्रास होत असल्याचं त्यांना अजिबात जाणवलं नव्हतं. ते अगदी व्यवस्थित बोलत होते. त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यातून प्रकृतीविषयी काही गंभीर संकेत मिळाले नव्हते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भेटलेली व्यक्ती आता आपल्यात नाही, ही गोष्ट त्यांच्या मनाला अधिक चटका लावणारी ठरली आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!