AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : 33 वर्षांपूर्वी ‘खलनायक’साठी नाना पाटेकर होते पहिली पसंती, मग संजय दत्तला कसा मिळाला ‘बल्लू’चा रोल?

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका केल्या, ज्या कायम आठवणीत राहतील. पण'खलनायक' साठी ते पहिली पसंती होते, हे तुम्हाला माहीत आहे का ? मग संजय दत्तला कशी मिळाली भूमिका ?

Nana Patekar : 33 वर्षांपूर्वी ‘खलनायक’साठी नाना पाटेकर होते पहिली पसंती, मग संजय दत्तला कसा मिळाला ‘बल्लू’चा रोल?
| Updated on: Oct 08, 2026 | 2:35 PM
Share

Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 वर्षी निधन झालं. गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त एक नामवंत अभिनेताच नव्हे तर स्पष्ट बोलणआरा, पण उत्तम माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी त्यांच्याा कारकिर्दीत मराठी आणि हिंदी चित्रपटात अनेक अविस्मरणीय, अजरामर भूमिका केल्या. ज्याची चाहेत आजही आठवण काढतात. त्यांच्या अभिनयात एक प्रकारचा गहिरेपणा होता, की एकदा एखादा माणूस चित्रपट पहायला बसला की तो संपेपर्यंत स्क्रीनसमोरून हलायचाच नाही. त्यांनी करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम रोल केले खर, पण काही चित्रपट त्यांच्या हातून सुटले, तर काही त्यांनी स्वत: सोडून दिले. पण हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट ‘खलनायक’ साठी नाना पाटेकर हे पहिली पसंती होते, हे तुम्हाला माहीत आहे का ? संजय दततापूर्वीच नाना यांना हा रोल देण्याचा दिग्दर्शक सुभाष घईंचाविचार होता. इतकंच नाही तर नानाही ह्या रोलसाठी खूप उत्साहित होते. मग असं काय झालं की’बल्लू’ हे ऐतिहासिक पात्र संजय दत्तच्या हाती गेलं?

1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. या चित्रपटात संजय दत्तने साकारलेली ‘बल्लू बलराम’ ही भूमिका प्रचंड गाजली. खुनशी, सनकी आणि तितकीच प्रभावी अशी ही व्यक्तिरेखा संजय दत्तच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या भूमिकेने त्याला रातोरात सुपरस्टारच्या उंचीवर नेऊन ठेवलं. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की ‘बल्लू बलराम’ची व्यक्तिरेखा सुरुवातीपासून संजय दत्तला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली नव्हती? या भूमिकेसाठी दिग्दर्शक सुभाष घई यांच्या मनात सर्वप्रथम नाना पाटेकर यांचे नाव होते.

नाना पाटेकर यांची निवड का झाली होती ?

खरं सांगायचं तर, त्या काळात नाना पाटेकर आपल्या गंभीर, वेगळ्या धाटणीच्या आणि आव्हानात्मक अभिनयासाठी ओळखले जात होते. त्यांच्या डोळ्यांतील तीव्रता, आवाजातील धार आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे शिरण्याची त्यांची क्षमता पाहता, ‘खलनायक’साठी आवश्यक असलेली वेडेपणाची आणि धोकादायक छटा त्यांच्या अभिनयातून सहजपणे दिसू शकत होती. सुभाष घई यांनी जेव्हा नानांना या कथेची कल्पना सांगितली, तेव्हा त्यांनाही ही व्यक्तिरेखा खूप आवडली. हा रोल साकारण्यासाठी नाना उत्सुक होते आणि सुरुवातीला ‘बल्लू बलराम’ची व्यक्तिरेखा त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच आकाराला आली होती.

सुभाष घई यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘खलनायक’ची मूळ कल्पना त्यांना रावणाच्या व्यक्तिरेखेतून सुचली होती. त्या काळात या दृष्टिकोनातून कुणीही चित्रपट बनवला नव्हता. विशेष म्हणजे, सुरुवातीला ‘खलनायक’ हा एक आर्ट फिल्मसदृश प्रकल्प होता. घई त्या काळात नाना पाटेकर यांच्यासोबत एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटावर काम करत होते. कथानक पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका व्यक्तीभोवती फिरत होते. मात्र त्यांच्या लेखकांनी त्यांना एक वेगळी दिशा सुचवली—ही कथा केवळ आर्ट फिल्मपुरती मर्यादित न ठेवता, तिला मोठ्या स्तरावर सादर का करू नये? त्यातूनच या कथेने कमर्शियल सिनेमाचा मार्ग धरला आणि पुढे ‘खलनायक’ची निर्मिती झाली.

कास्टिंग दरम्यान काय घडलं ?

रामची भूमिका कोण साकारणार, याबाबत सुभाष घई सुरुवातीपासूनच ठाम होते. त्यांच्या मते ही भूमिका फक्त जैकी श्रॉफच करू शकत होते. त्यामुळे या व्यक्तिरेखेसाठी कास्टिंग करणे त्यांच्यासाठी सर्वात सोपं होतं. मात्र खलनायकाच्या भूमिकेसाठी वेगवेगळ्या शक्यता समोर येत होत्या. अनिल कपूर यांनाही ही भूमिका साकारण्याची प्रचंड इच्छा होती. ते दोन-तीन वेळा सुभाष घई यांच्या घरी गेले होते आणि त्यांनी या भूमिकेबद्दल आपली उत्सुकता व्यक्त केली होती.

पण सुभाष घई यांना मात्र अनिल कपूर या भूमिकेत योग्य वाटत नव्हते. त्यांनी स्पष्टपणे अनिल कपूर यांना सांगितले होते की, हा रोल त्यांना शोभणार नाही. त्यांच्या मते चुकीच्या कलाकाराची निवड झाली, तर त्याचा परिणाम केवळ त्या भूमिकेवर नाही, तर संपूर्ण चित्रपटावर होऊ शकतो. दरम्यान, चित्रपटाची कथा आर्ट फिल्मच्या चौकटीतून बाहेर पडून एक मोठा मेनस्ट्रीम मसाला एंटरटेनर म्हणून आकार घेत असताना, सुभाष घई यांची नजक अखेर संजय दत्तकडे वळली. आणि त्यानंतर जे घडलं, ते हिंदी सिनेमाच्या इतिहासाचा भाग बनलं. संजय दत्तने साकारलेला बल्लू बलराम इतका लोकप्रिय झाला की, ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखांपैकी एक ठरली.

Follow Us
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?