AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; पण त्यासाठीचे नियम काय असतात?

अभिनेते नाना पाटेकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, शासकीय सन्मान आणि शासकीय दुखवटा यांच्यामध्ये नेमका फरक काय याबद्दल जाणून घेऊयात.

नाना पाटेकरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; पण त्यासाठीचे नियम काय असतात?
Nana patekar newsImage Credit source: social media
| Updated on: Oct 08, 2026 | 6:05 PM
Share

आज सकाळी ५.२० मिनिटांनी नाना पाटेकरांची प्राणज्योत मावळली. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील घरी त्यांना हृदयविकाराच्या धक्का आला. त्यानंतर त्यांना गोव्यातल्या मणिपाल रुग्णालयात दाखल केले गेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना यांनी बॉलिवूड आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांच्यावर राज्य सरकार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणार आहे. पुणे जिल्ह्यातील डोणजे गावामध्ये अंत्यसस्काराची तयारी करण्यात आली आहे. पण आता प्रश्न असा आहे की, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार म्हणजे काय आणि ते शासकीय दुखवट्यापेक्षा कसे वेगळे असतात? चला तर मग जाणून घेऊयात.

शासकीय सन्मान म्हणजे काय?

हा सन्मान म्हणजे सरकारकडून दिवंगत व्यक्तीला दिली जाणारी अधिकृत अंतिम निरोप असतो. अंत्यसंस्काराचे संपूर्ण आयोजन सरकारी प्रोटोकॉलनुसार होते, जे त्या व्यक्तीच्या योगदानाबद्दलची राष्ट्राची कृतज्ञता म्हणून पाहिले जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांसारख्या पदांवर असलेल्या किंवा राहिलेल्या व्यक्तींना हा सन्मान मिळतो.

याशिवाय, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा किंवा क्रीडा क्षेत्रातील असामान्य योगदानासाठी सरकार स्वतःच्या ठरवून हा सन्मान देऊ शकते उदा. लता मंगेशकर, श्रीदेवी आणि रतन टाटा यांना याच पद्धतीने निरोप देण्यात आला होता.

प्रोटोकॉल आणि नियम

पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळले जाते, ज्यामध्ये केशरी रंग डोक्याकडे असतो. अंत्यसंस्कारापूर्वी तिरंगा सन्मानाने काढून कुटुंबाकडे सोपवला जातो. सलामी व बिगुल वाजवला जातो. पोलीस किंवा सशस्त्र दलांची तुकडी शस्त्रे झुकवून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देते. हवेत ३ वेळा गोळ्या झाडून सलामी दिली जाते आणि बिगुलवर अंतिम निरोपाचे प्रतीक असलेली ‘लास्ट पोस्ट’ धून वाजवली जाते. हा सन्मान देण्यासाठी कुटुंबाची संमती आवश्यक असते आणि राष्ट्रीय ध्वज संहिता, २००२ चे कठोर पालन केले जाते.

शासकीय दुखवटा म्हणजे काय?

शासकीय सन्मान आणि शासकीय दुखवटा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शासकीय दुखवटा ही सरकारकडून घोषित केलेली दुखवट्याची अधिकृत वेळ असते. या काळात सरकारी इमारतींवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवला जातो आणि सर्व सरकारी मनोरंजन कार्यक्रम रद्द केले जातात. आवश्यकतेनुसार सरकार सार्वजनिक सुट्टीही जाहीर करू शकते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा तर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर २ दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्यात आला होता.

Follow Us
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू