AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाताशाच्या एक्स-बॉयफ्रेंडचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो, फोटो पाहताच अभिनेत्रीने केलं असं काम

Natasha Stankovic Ex-Boyfriend: घटस्फोटानंतर नताशा झाली एकटी, एक्स-बॉयफ्रेंडचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो पाहताच अभिनेत्रीने केलं असं काम? चर्चांना उधाण, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा हिची चर्चा...

नाताशाच्या एक्स-बॉयफ्रेंडचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो, फोटो पाहताच अभिनेत्रीने केलं असं काम
| Updated on: Sep 24, 2024 | 11:16 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाचा दमदार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवासांपूर्वी हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा यांचा घटस्फोट झाला आहे. सांगायचं झालं तर, हार्दिक पांड्या याच्यासोबत लग्न करण्याआधी नताशा हिने अभिनेता अली गोनी याला डेट करत होती. पण नताशा आणि अली गोनी यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर देघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नताशा हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अली गोनी याच्या आयुष्यात अभिनेत्री जास्मिन भसीन हिची एन्ट्री झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अली गोनी आणि जास्मिन एकमेकांना डेट करत आहेत. आता अली गोनी याने गर्लफ्रेंड जास्मिन हिच्यासोबत एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये दोघे देखील आनंदी दिसत आहेत. अली याने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. पण एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सांगायचं झालं तर, अली गोनी आणि जास्मिन भसीन यांचा फोटो चाहत्यांसोबत अभिनेत्री नताशा हिला देखील आवडला आहे. नताशा हिने एक्स-बॉयफ्रेंडचा फोटो लाईक देखील केला. हार्दिक पांड्या याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नताशा हिने अली गोनी याची पोस्ट लाईक केली आहे.

अली गोनी – नताशा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर. ‘नच बलिए 9’ मध्ये नताशा आणि अली स्पर्धक म्हणून सहभागी होते. शो संपल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. दोघांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. दोघे आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असले तरी कायम दोघांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते.

का झालं नताशा आणि अली गोनी यांचं ब्रेकअप?

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये अली गोनी यांनी ब्रेकअपवर वक्तव्य केलं होतं. नताशा हिचं नाव न घेता अली म्हणाला, ‘तिला कुटुंबासोबत राहायचं नव्हतं. त्यामुळे आमचं ब्रेकअप झालं…’ असं अली म्हणाला होता.

हार्दिक आणि नताशा यांचं नातं

चार वर्षांच्या नात्यात नताशा – हार्दिक यांनी दोन वेळा लग्न केलं. 2020 मध्ये नताशा – हार्दिक यांनी गुपचूप लग्न उरकलं होतं. पण फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर 2023 मध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेने लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक