Nawazuddin Siddiqui | पत्नी-आईमधल्या भांडणामुळे नवाजुद्दीन सिद्दिकीवर आली घर सोडण्याची वेळ

नवाजुद्दीनच्या आईने असा आरोप केला आहे की आलिया ही नवाजुद्दीनची कायदेशीर पत्नी नाही. तर दुसरीकडे आलियानेही कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. नवाजुद्दीनचे कुटुंबीय तिला जेवण देत नाहीयेत आणि घरातील बाथरुमसुद्धा वापरू देत नाहीयेत, असं तिने या तक्रारीत म्हटलं आहे.

Nawazuddin Siddiqui | पत्नी-आईमधल्या भांडणामुळे नवाजुद्दीन सिद्दिकीवर आली घर सोडण्याची वेळ
Nawazuddin Siddiqui
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 3:54 PM

मुंबई: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या त्याच्या कौटुंबिक समस्यांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीनची पत्नी आलिया आणि आई मेहरुनिसा यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद सुरू आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दिकी यांनी नुकतीच सूनेविरोधात एफआयआर दाखल केली होती. तर नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता नवाजुद्दीनवर घर सोडण्याची वेळ आली आहे. या वादामुळेच त्याला सध्या हॉटेलमध्ये राहावं लागतंय.

नवाजुद्दीनवर हॉटेल रुममध्ये राहण्याची वेळ

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, नवाजुद्दीनच्या एका मित्राने सांगितलं आहे की तो सध्या घर सोडून हॉटेलमध्ये राहत आहे. इतकंच नव्हे तर पत्नी आणि आईमधील हा वाद मिटेपर्यंत तो हॉटेलमध्येच राहणार आहे. नवाजुद्दीनने नुकतंच अंधेरीत आपलं नवीन घर बांधलं होतं. त्याचं हे घर अत्यंत आलिशान आणि एखाद्या महालासारखंच आहे. मात्र कौटुंबिक वादामुळे त्याला महालासारखं हे घर सोडून हॉटेल रुममध्ये राहावं लागतंय.

नवाजुद्दीनच्या पत्नीविरोधात आईने दाखल केली होती FIR

नवाजुद्दीनच्या आईने असा आरोप केला आहे की आलिया ही नवाजुद्दीनची कायदेशीर पत्नी नाही. तर दुसरीकडे आलियानेही कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. नवाजुद्दीनचे कुटुंबीय तिला जेवण देत नाहीयेत आणि घरातील बाथरुमसुद्धा वापरू देत नाहीयेत, असं तिने या तक्रारीत म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

नवाजुद्दीन आणि आलियाचा वाद

आलिया आणि नवाजुद्दीनने 2010 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना दोन मुलं आहेत. 6 मे 2020 रोजी आलियाने नवाजुद्दीनला घटस्फोट देण्यासाठी अर्ज केला. मात्र नंतर 2021 मध्ये तिने तो अर्ज मागे घेतला. कोविडदरम्यान नवाजुद्दीनने मुलांची आणि तिची काळजी घेतल्याने आलियाने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. “मला कोविडची लागण झाली होती. त्यावेळी नवाजुद्दीनने फक्त मुलांची नाही तर माझी पण काळजी घेतली. मी त्याच्याविषयी जे काही म्हणाले, त्यानंतरही त्याने माझी मदत केली. कोरोना महामारीमुळे माझे डोळे उघडले”, अशी कबुली आलियाने दिली होती.

मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले होते. “लग्नाआधी आणि लग्नानंतरही आमच्यात खूप भांडणं झाली. मी जेव्हा गरोदर होते, तेव्हा मलाच स्वत:ची सर्व काळजी घ्यावी लागली होती. माझ्या डिलिव्हरीच्या वेळीही तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोनवर बोलत होता. फोनबिल्सवरील माहितीमुळे मला हे सर्व समजलं”, असं ती म्हणाली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.