एनसीबीच्या प्रश्नांना सामोरी जाणार बॉलिवूडची ‘मस्तानी’, चॅटमध्ये ‘माल’चा उल्लेख पडला भारी

2017मध्ये झालेल्या ड्रग संभाषणाच्या आधारे दीपिका पदुकोणला चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आला आहे.

एनसीबीच्या प्रश्नांना सामोरी जाणार बॉलिवूडची ‘मस्तानी’, चॅटमध्ये ‘माल’चा उल्लेख पडला भारी

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुल प्रीत सिंगला (Rakul Preet Singh) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) समन्स बजावले आहे. एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण काल रात्री मुंबईत दाखल झाली आहे. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले आहे. या चौकशीकरिता दीपिकासाठी एनसीबीने 35 प्रश्नांची (questions) यादी तयार केल्याची चर्चा आहे (NCB prepare 35 questions for Deepika Padukone).

मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) सोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटही (drug group) NCBच्या हाती लागले आहेत. त्या कथित चॅटमध्ये दीपिका करिश्माला विचारते, ‘तुझ्याकडे माल आहे का’? करिश्मा यावर रिप्लाय देते की, ‘हो… पण घरी आहे. मी आता वांद्र्याला आहे. जर म्हणशील तर अमितला विचारते.’ परत दीपिका मेसेज करते. ‘हो प्लीज’. काही वेळानं करिश्मा उत्तर देते, ‘अमित घेऊन येत आहे.’ यावर दीपिका विचारते, ‘हॅश आहे का?’ त्यावर करिश्मा म्हणते की, ‘हॅश नाही गांजा आहे.’

2017मध्ये झालेले हे संभाषण दीपिका (Deepika Padukone) आणि तिच्या मॅनेजरमधील आहे. या संभाषणाच्या आधारे दीपिकाला चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आला आहे. या चौकशीसाठी एनसीबीने 35 प्रश्नांची यादी तयार केली आहे. तर, दीपिकाच्या बचावासाठी रणबीरनेही वकिलांची जुळवाजुळव सुरू केली आहे. काल ‘दिपवीर’ दाम्पत्याने 25 वकिलांशी सल्लामसलत केली आहे. एनसीबीच्या (NCB) 35 प्रश्नांपैकी ‘हे’ काही अति महत्त्वाचे असू शकतात (NCB prepare 35 questions for Deepika Padukone).

मस्तानीसाठी ३५ प्रश्नांची यादी

  • तू जया साहाला, करिश्मा प्रकाशला ओळखतेस का?, आणि हो तर कधी आणि का भेटली होतीस?
  • करिश्मा कोणत्या ड्रग्ज तस्कराकडून ड्रग्ज मागवायची?, तुला याबाबत काही माहिती आहे का?
  • 2017मध्ये कोको क्लबमधील पार्टी कुणी आयोजित केली होती, या पार्टीत कोणकोणते फिल्म स्टार्स आले होते?, ड्रग्जचे सेवन कुणी केले होते का?
  • तपासादरम्यान आम्हाला 2017मध्ये, तू केलेले चॅट सापडले आहे, त्याबाबत सांग आणि अमित, शेल कोण आहेत? त्यांना तू ओळखतेस का?
  • या चॅट्समध्ये तू हॅश, माल याबाबत बोलते आहेस, त्याबाबत स्पष्टीकरण दे. ड्रग्ज कुणासाठी मागवले होतेस की, तू घेतलले होतेस…?
  • तू चॅट्समध्ये ड्रग्जची मागणी करते आहेस तर, त्याचे पैसे कसे दिले होते आणि तुला डिलीव्हरी कधी मिळाली?
  • तू ड्रग्ज घेतेस का? जर ड्रग्ज घेतेस तर कधीतरी घेतेस, की एका विशेष कालावधीत घेते? पहिल्यांदा तू ड्रग कधी घेतले होते?
  • 2017मध्ये तुझ्याकडे हाच मोबाइल नंबर होता का?

दीपिका पदुकोण ड्रग्ज घेत असल्यानेच डिप्रेशनमध्ये गेली होती, असे बोलले जात आहे. हे चॅट जरी 2017चे असले तरी, सुशांतचा मृत्यू यावेळी चौकशीसाठी निमित्त ठरला आहे. ज्यामुळे दीपिका पुरती फसली आहे. बॉलिवूडमध्ये 95 टक्के लोक ड्रग्ज घेतात, असा खळबळजनक खुलासा अभिनेत्री शर्लिन चोप्राने केल्यानंतर या प्रकरणात आणखी मोठे मासे अडकण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत.

संबंधित बातम्या : 

ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स

karan Johar Party Video : आता करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, ‘शिरोमणी’च्या आमदाराची NCB कडे तक्रार

Bollywood Drugs Case | अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांना एनसीबीचा समन्स

(NCB prepare 35 questions for Deepika Padukone)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *