भल्या पहाटे धाड टाकून सॅम्युएल मिरांडाला उचललं, रियाच्या घरी पोहोचलेला NCB चा अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती

भल्या पहाटे धाड टाकून सॅम्युएल मिरांडाला उचललं, रियाच्या घरी पोहोचलेला NCB चा अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती

सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली.

अनिश बेंद्रे

|

Sep 04, 2020 | 5:44 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे गूढ सोडवण्यात सीबीआयची एसआयटी गुंतलेली आहे. पण यातील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्याने ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ अर्थात ‘एनसीबी’ टीमही याचा तपास करत आहे. केंद्र सरकारने कडक शिस्तीच्या आयपीएस अधिकाऱ्याला एनसीबीकडे पाठवले आहे, ज्यांचे नाव आहे समीर वानखेडे. तपासकार्यात वानखेडे यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूडमधील अनेकांचे धाबे दणाणल्याचे बोलले जाते. (NCB Team IPS Officer Sameer Wankhede is Actress Kranti Redkar’s Husband)

समीर वानखेडे यांच्या टीमने भल्या पहाटे धाड टाकून आधी सॅम्युएल मिरांडाच्या घराची झाडाझडती घेतली. त्याला चौकशीसाठी उचललं. त्याच वेळी वानखेडे अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी पोहोचले होते. तिच्याही घरात सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला ताब्यात घेतले.

इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समीर वानखेडे एका मराठी अभिनेत्रीचे पती आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली. त्यांना जुळी मुलंही आहेत. क्रांती रेडकर ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल अशा अनेक सिनेमात झळकली आहे.

कोण आहेत समीर वानखेडे?

महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.

समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

एनसीबीच्या चौकशीत आयपीएस समीर वानखेडे यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडमधील जे कलाकार ड्रग्ज घेतात किंवा मादक पदार्थांची खरेदी-विक्री करतात ते या क्षणी घाबरल्याची चर्चा आहे, याचे कारण समीर वानखेडे. डीआरआयमध्ये तैनात समीर वानखेडे यांना गेल्या आठवड्यातच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये पाठवण्यात आले आहे. आता समीर मुंबईत उपस्थित असलेल्या एनसीबी टीमचा एक भाग आहेत, जी सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करत आहे.

रिया चक्रवर्तीच्या मार्गे तपासाची व्याप्ती बॉलिवूडपर्यंत पोहोचली असल्याने एनसीबी बॉलिवूडमध्येही ‘साफसफाई’चे काम करेल हे निश्चित आहे. समीर वानखेडे यापूर्वीही एनसीबीमध्ये होते. सूत्रांच्या माहितीनुसार समीर वानखेडे यांना बॉलिवूड आणि ड्रग्जची पाळेमुळे खणून काढण्यासाठी एनसीबीमध्ये पाठवले आहे.

View this post on Instagram
(NCB Team IPS Officer Sameer Wankhede is Actress Kranti Redkar’s Husband)

You deserve every bit of this award. This certifies your hardwork and passion for your job. Absolutely not caring about your life and putting your service and nation first. I have been with you through this journey, awake through those nights while you carried out these operations. Today this award validates all that you stand for honesty and perseverance. I salute you and your team at DRI who stands by you rock solid and delivers each time. Once again hats off on winning the DIRECTORATE GENERAL DISC . This brings honour to all of us. Thank you for being you 👍🏻👍🏻👍🏻 #proudwife of @sameer_wankhede1979

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

संबंधित बातम्या :

सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती NCB च्या ताब्यात, रियाच्या घराची झाडाझडती

(NCB Team IPS Officer Sameer Wankhede is Actress Kranti Redkar’s Husband)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें