‘पैशांसाठी वाईट काम केलं आणि…’, ब्रेकअपनंतर ‘या’ क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडवर आलेले कठीण दिवस

Actress Life | अभिनेत्रीचे 'या' क्रिकेटरसोबत प्रेमसंबंध, अभिनेत्री प्रेग्नेंट राहिल्यानंतर त्याने सोडली साथ, 'सिंगर मदर' म्हणून राहिलेल्या अभिनेत्रीवर आले कठीण दिवस, पैशांसाठी केलं वाईट काम, आज जगते रॉयल आयुष्य... अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

'पैशांसाठी वाईट काम केलं आणि...', ब्रेकअपनंतर 'या' क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडवर आलेले कठीण दिवस
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 9:45 AM

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहे, ज्यांनी प्रेम तर केलं. पण त्यांच्या वाट्याला फक्त दुःख आणि एकटेपणा आला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता. आज नीना गुप्ता रॉयल आयुष्य जगत आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांनी पैशांसाठी वाईट काम केलं. एका मुलाखतीत खुद्द नीना गुप्ता यांनी आयुष्यात आलेल्या वाईट दिवसांवर मौन सोडलं. अनेकांना माहिती आहे की, नीना गुप्ता यांनी वेस्टइंडीजचे दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Viv Richards) यांना डेट केलं. नीना आणि विवियन यांना एक मुलगी देखील आहे.

नीना यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना विवियन विवाहित होते. त्यांनी पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेल… असं वचन नीना यांनी दिलं होतं. पण असं काहीही झालं नाही. नीना गुप्ता प्रेग्नेंट राहिल्यानंतर विवियन यांनी अभिनेत्रीची साथ सोडली. अशात नीना यांनी अनेक वाईट दिवसांचा सामना केला.

विवियन यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नीना यांनी मुलीला जन्म दिला. नीना आणि विवियन यांच्या मुलीचं नाव मसाबा गुप्ता आहे. मसाबा आता 33 वर्षांची आहे. मसाबा बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे. मसाबा देखील तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

हे सुद्धा वाचा

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता जुने दिवस आठवत म्हणाल्या, ‘आज आर्थिक परिस्थीती चांगली असल्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. पण करियरच्या सुरुवातीला मला पैशांची गरज होती. पैशांसाठी मला वाईट काम करावं लागलं, घाणेरडे रोल करावे लागले. मी देवाला कायम प्रार्थना करायची की सिनेमा कधी प्रदर्शित होऊच नये…’

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, ‘पूर्वी न आवडणाऱ्या भूमिकेला मी नाही बोलू शकत नव्हती. कारण माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. पण आता मी पूर्ण स्क्रिप्ट वाचून भूमिका करायची की नाही ठरवते. मला जी स्क्रिप्ट आवडते, त्याच भूमिका मी करते…’

एवंढच नाहीतर, ‘माझ्या निधनानंतर देखील मला बोल्ड आणि ग्लॅमरस नीना गुप्ता यांचं निधन झालं… असं अनेक जण लिहितील…’, असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या… नीना गुप्ता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सध्या नीना गुप्ता ‘पंचायत 3’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. सीरिजमध्ये नीना यांनी गावच्या प्रधान महिलेची महिलेची भूमिका साकारली आहे. गावातील चित्र कसं असतं… हे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. नीना गुप्ता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. वयाच्या 63 व्या वर्षी देखील नीना गुप्ता यांचं सौंदर्य कायम आहे.

Non Stop LIVE Update
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.