Neena Gupta |नीना गुप्ता यांनी ‘त्या’ किसिंग सीननंतर चक्क डेटॉलने भरली चूळ; वाचा नेमकं काय घडलं?

या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या पहिल्या लिप-टू-लिप किसिंग सीनचा प्रसंग सांगितला. या किसिंग सीननंतर नीना यांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की त्यांनी चक्क अँटिसेप्टिकने चूळ भरली होती.

Neena Gupta |नीना गुप्ता यांनी 'त्या' किसिंग सीननंतर चक्क डेटॉलने भरली चूळ; वाचा नेमकं काय घडलं?
Neena GuptaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 8:39 AM

मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त होतात. त्यांचा ‘लस्ट स्टोरीज 2’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. स्त्रियांच्या कामुक भावनेबद्दलच्या विविथ कथा यात आधुनिक दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या पहिल्या लिप-टू-लिप किसिंग सीनचा प्रसंग सांगितला. या किसिंग सीननंतर नीना यांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की त्यांनी चक्क अँटिसेप्टिकने चूळ भरली होती. 1990 च्या सुरुवातीला जेव्हा ‘दिल्लगी’ या शोमध्ये त्या काम करत होत्या, तेव्हाची ही घटना आहे.

भारतीय टीव्ही इंडस्ट्रीच्या इतिहासातील पहिला ऑन-कॅमेरा किसिंग सीन

त्याकाळी छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दाखवणं सोपं नव्हतं. ‘दिल्लगी’ मालिकेच्या वाहिनीकडून जेव्हा किसिंग सीन असलेल्या एपिसोडचं प्रमोशन करण्यात आलं, तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. भारतीय टीव्ही इंडस्ट्रीच्या इतिहासातील पहिला ऑन कॅमेरा किसिंग सीन असल्याची जाहिरात त्यांनी केली होती. इनसाइड बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणाल्या, “एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुम्हाला सगळे सीन्स करावे लागतात. कधीकधी तुम्हाला चिखलात पाय ठेवावा लागतो तर कधी तासनतास उन्हात उभं राहावं लागतं.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

“शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी तयार नव्हते”

किसिंग सीन आठवत नीना पुढे म्हणाल्या, “बऱ्याच वर्षांपूर्वी मी दिलीप धवन यांच्यासोबत एक मालिका केली होती. भारतीय टीव्हीच्या इतिहासातील पहिला लिप-टू-लिप किसिंग सीन त्यात होता. मी रात्रभर झोपू शकले नव्हते. दिलीप माझे मित्र नव्हते, पण आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते दिसायलाही हँडसम होते, पण अशा परिस्थितीत ही गोष्टसुद्धा महत्त्वाची नसते. कारण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी तयार नव्हते. मी खूप चिंतेत होते, पण अखेर स्वत:ला समजावलं की मला यातून जायचंच आहे.”

किसिंग सीननंतर डेटॉलने भरली चूळ

“काही लोक कॉमेडी करू शकत नाहीत, तर काही जण कॅमेरासमोर रडू शकत नाही, अशीच ही एक गोष्ट होती. तो सीन संपताच मी डेटॉलने चूळ भरली. ज्या व्यक्तीला मी चांगल्याप्रकारे ओळखत नाही, त्याला किस करणं खूप कठीण होतं. चॅनलकडून या सीनचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांच्यावर खूप टीका झाली. अखेर त्यांना हा सीन काढावा लागला. मी उत्सवमध्येही इंटिमेट सीन केला होता. तोसुद्धा खूप कठीण होता”, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.