मुंबई: आपल्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी नीना गुप्ताचं चर्चेत येण्याचं कारण मात्र वेगळं आहे. ‘सच कहूं तो’ हे तिचं आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात तिच्या फिल्मी करियरपासून ते व्यक्तिगत आयुष्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यामुळे नीनाप्रमाणेच तिचं हे आत्मचरित्रं वादळी ठरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Neena Gupta’s autobiography ‘Sach Kahun Toh’ to release on June 14)
नीना गुप्ताने इन्स्टाग्रामवरून ‘सच कहूँ तो’ या तिच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाची घोषणा केली आहे. येत्या 14 जून रोजी ‘सच कहूं तो’चं प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासून सुरू झालेल्या प्रवासापासूनची कहाणी आहे. माजी क्रिकेटपटू व्हिव्हीयन रिचर्डसोबतची रिलेशनशीप, त्यातून जन्माला आलेलं मुलगी यासह आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. या पुस्तकातून नीना गुप्ताच्या आयुष्यातील चढउतार वाचायला मिळणार आहे.
या पुस्तकाची पहिली कॉपी मिळाल्याबद्दल नीना गुप्ताने आनंद व्यक्त केला आहे. तिने इन्स्टा पोस्टमध्ये तिच्या आत्मचरित्राचं कव्हरपेज शेअर केलं आहे. कव्हरपेजवर नीनाचा हसतमुख फोटो आहे. त्यावर ‘सच कहूं तो’ असं लिहिलं आहे. प्री-ऑर्डर करण्यासाठी हे पुस्तक उपलब्ध असल्याचंही तिने म्हटलं आहे.
View this post on Instagram
त्याशिवाय नीनाने एक व्हिडीओही शेअर केला आहे. पुस्तक पाहून प्रचंड आनंद झाला असल्याचं तिने या व्हिडीओत म्हटलं आहे. तसेच तिच्या चाहत्यांचे तिने आभारही मानले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी माझं आत्मचरित्रं ‘सच कहूं तो’ लिहिलं होतं. हा प्रचंड कठिण काळ आहे. सर्वत्र उदासिनता आहे. आपण सर्व घरात अडकून पडलो आहोत. सर्वचजण चिंतित आहेत. त्यामुळे माझं हे पुस्तक वेळ घालवण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकतं, असं मला वाटलं, असं तिने म्हटलं आहे. (Neena Gupta’s autobiography ‘Sach Kahun Toh’ to release on June 14)
View this post on Instagram
संबंधित बातम्या:
Photo: लेझी संडे… मीरा जोशीचा हॉट अँड क्लासी अंदाज; फोटो पाहाच
Photo: दिल ले गई कुड़ी… सपना चौधरीचा साडीतील लूक पाहून चाहत्यांची धडधड वाढली!
21 वर्षाचा ‘सुहाना’ सफर, शाहरुखच्या कन्येकडून बोल्ड फोटो शेअर; ‘या’ अभिनेत्रीची खास कमेंट
(Neena Gupta’s autobiography ‘Sach Kahun Toh’ to release on June 14)