AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याचे 300 तुकडे केले, नंतर बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध, सुंदर हिरोईनचा भयानक कांड!

सिनेसृष्टीतील असे एक खून प्रकरण आहे, ज्याची आठवण काढली आजही अंगावर काटा येतो. एका अभिनेत्रीने आपल्याला मदत करणाऱ्याचेच 300 तुकडे केले होते.

त्याचे 300 तुकडे केले, नंतर बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध, सुंदर हिरोईनचा भयानक कांड!
actress maria susairaj
| Updated on: Jun 17, 2025 | 4:48 PM
Share

Niraj Grover Murdre Case : सिनेसृष्टी हे असे क्षेत्र आहे जिते एखादा गॉडफादर भेटला की मोठं नाव कमवता येऊ शकतं. सुरुवातीच्या काळात मदत केलेल्या लोकांना कधीच विसरायचं नसतं. आजखडीला सिनेजगतात मोठं नाव असलेले असे काही चेहरे आहेत, जे आपल्या सुरुवातीच्या काळातील लोकांना विसरत नाहीत. एक अभिनेत्री मात्र सर्वांपेक्षा वेगळी निघाली. ज्याने करिअर बनण्यास तिला मदत केली होती, त्याचाच क्रूरतेने खून केला होता. आपल्या प्रियकराला सोबत घेऊन तिने तिला मदत करणाऱ्याच्या शरीराचे तब्बल 300 तुकडे केले होते. विशेष म्हणजे तिने खून करून बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवले होते. मरिया सुसेराज असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

हे हत्या प्रकरण 2008 सालचे आहे. मरिया सुसेराज हिने आपल्या प्रयिकराला सोबत घेऊन नीरज ग्रोवर यांची हत्या केली होती. या हत्येमुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरून गेली होती.

नीरज ग्रोवरने केली होती मरियाला मदत

कन्नड सिनेसृष्टीतील मरिया सुसेराज हिला नीरज ग्रोवरने सुरुवातीच्या काळात खूप मदत केली होती. नीरज ग्रोवर हा टेलिव्हिजन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचा. नीरज ग्रोवर तिला मालिकांत भूमिका द्यायचा. मरियाच्या ऑडिशनसाठीही नीरजने पैसे खर्च केले होते. मरियाला तिचे अपार्टमेंट बदलायचे होते. त्यावेळीही नीरजने तिला मदत केली होती. त्यानंतर मात्र मोठ्या अचंबित करणाऱ्या घटना घडल्या. नीरज अचानक एक दिवस गायब झाला होता. त्याचा पुढच्या कित्येक दिवस शोध घेतला जात होता. हे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर मरियाची चौकशी करण्यात आली होती आणि हे खून प्रकरण समोर आले होते.

मरिया एके दिवशी…

मिळालेल्या माहितीनुसार मरिया सुसेराज आणि लेफ्टनंट जेरोम मॅथ्यू हे एकमेकांवर प्रेम करायचे. दोघांचाही साखरपुडा झाला होता. मात्र नीरज मरियाची मदत करतोय हे मॅथ्यूला आवडत नव्हते. मरिया एके दिवशी तिचे घर बदलत होती. ती दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहायला जात होती. त्यावेळी नीरज मरियाला घर बदलण्यासाठी मदत करत होता.

नीरज पलंगावर झोपलेला होता

त्याच वेळी मॅत्यू मरियाच्या घरी पोहोचलो होता. त्याने दरवाजाची घंटी वाजवली होती. पण आतून दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर मॅथ्यूने रागात येऊन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मॅथ्यू रागात घरात घुसला तेव्हा नीरज पलंगावर झोपलेला होता. हे पाहून मॅथ्यलूा जास्तच राग आला होता. रागात येत तो स्वयंपाकघरात गेला आणि त्याने चाकू आणऊन नीरजवर अनेक वार केले. यात नीरज यांचा मृत्यू झाला.

खून करून ठेवले शरीरसंबंध

ही हत्या झाल्यानंतर मरियाने नीरजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. तिच्या घरात सगळीकडे रक्त साचले होते. त्या सगळ्या घराची तिने साफसफाई केली. त्यानंतर नीरजचा मृतदेह दुसरीकडे ठेवून मरिया आणि मॅथ्यूने शरीरसंबंध प्रस्थापित केले होते, असे म्हटले जाते. दरम्यान, नीरजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मरिया आणि मॅथ्यू यांनी शॉपिंग मॉलमध्ये जाऊन चाकू, प्लास्टिकची बॅग, पेट्रोल खरेदी केले. त्यांनी नीरजच्या मृतदेहाचे एकूण 300 तुकडे केले आणि एका जागेवर नेऊन ते जाळून टाकले. पोलिसांनी मात्र तिची कसून चौकशी केली. नंतर तिने आम्हीच नीरजचा खून केल्याचं तिने मान्य केलं.

दरम्यान, या प्रकरणात मरियाला तीन वर्षांची तर मॅथ्यू याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. खूनाची ही घटना सिनेसृष्टीसाठी धक्कादाक होता.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.