AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती विसर्जनावेळी नीतू कपूर अन् आलिया का झाल्या ट्रोल? नीतू यांच्याकडून आरती करताना घडलं असं काही…

गणपती विसर्जनानंतर नीतू कपूर आणि आलिया भट्ट यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. नीतू कपूर यांनी आरती करताना त्यांच्याकडून झालेल्या त्या कृतीबद्दल ट्रोल करण्य़ात आलं. तर आलिया भट्टच्या वागण्याबद्दलही नेटकऱ्यांचा रोष व्यक्त केला आहे.

गणपती विसर्जनावेळी नीतू कपूर अन् आलिया का झाल्या ट्रोल? नीतू यांच्याकडून आरती करताना घडलं असं काही...
Neetu Kapoor, Alia Bhatt Trolled for Ganesh Visarjan What Happened Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2025 | 6:20 PM
Share

एकेकाळी कपूर कुटुंबाचा गणेशोत्सव संपूर्ण इंडस्ट्रीत प्रसिद्ध होता. कपूर कुटुंबात 5 दिवसांसाठी बाप्पाचं आगमन होतं. यावेळीही कपूर कुटुंबात गणेशाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तसेच पाचव्या दिवशी म्हणजे रविवारी बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळीही रणबीर कपूर गणपती विसर्जनाला आई नीतू कपूरसोबत आलेला दिसला. बाप्पाला निरोप देताना रणबीरने बाप्पाची पूजा केली, हात जोडून त्यांचे आशीर्वाद घेतले, आरती केली.

आरतीवेळी एका वृद्ध माणसाचा धक्का लागताच

यावेळी नीतू कपूर यांनी देखील बाप्पाची आरती केली. यावेळी आरतीवेळी एका वृद्ध माणसाचा धक्का लागताच त्यांनी जे हावभाव केले ते लोकांना आवडले नाहीत. तसेच त्यांनी बाप्पाची आरती करतानाही चूक केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं. खरंतर, नीतू यांनी एका हाताने पूजा थाळी आणि दुसऱ्या हाताने दुपट्टा धरला होता. आणि एका हातानेच बाप्पाची आरती केली. हे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना एका हाताने आरती केल्याबद्दलही सोशल मीडियावर फटकारलं आहे.

Neetu Kapoor Trolled

नीतू सिंगच नाही तर आलिया भट्टलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं

यावेळी फक्त नीतू सिंगच नाही तर आलिया भट्टलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. कारण दरवर्षीप्रमाणे यावेळीही आलिया भट्ट गणपती विसर्जनात सहभागी झालेली दिसली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आलियाला देखील ट्रोल केले आहे. एका युजर्सने म्हटलं आहे ‘आलिया नेहमीच अशा क्षणांपासून गायब का असते?’ दुसऱ्या व्यक्तीने टिका करत म्हटलं, ‘आलिया भारतीय सण का साजरे करताना दिसत नाही? कारण ती ब्रिटिश नागरिक आहे म्हणून का?’ तर अजुन एकाने लिहिले की, ‘आलिया आली नाही, ती खूप पार्टी करते.’ याशिवाय एका युजरने म्हटले- ‘आलिया गणेश चतुर्थीला सहभागी होत नाही हे दुःखद आहे.’

आलिया दरवर्षी गणपती विसर्जनापासून दूर का राहते?

रणबीर कपूर दरवर्षी त्याची आई नीतू कपूरसोबत गणपती विसर्जन करताना दिसतो. पण आलिया भट्ट नेहमीच गणपती पूजेपासून दूर राहताना दिसली आहे. याहीवेळी तसंच काहिसं दृश्य दिसल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

Aliya Bhatt Trolled

रणबीर कपूरच्या कामाच्या बाबतीत

रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याचे ‘रामायण’, ‘ब्रह्मास्त्र २’ आणि ‘अ‍ॅनिमल पार्क’ सारखे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.