Video | घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी नेहा कक्करने शोधून काढली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर (Nehha Kakkar) तिच्या आरोग्याची आणि फिटनेसची विशेष काळजी घेते. अनेक वेळा वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ (Workout Video) तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Video | घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी नेहा कक्करने शोधून काढली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ
नेहा कक्कर

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर (Nehha Kakkar) तिच्या आरोग्याची आणि फिटनेसची विशेष काळजी घेते. अनेक वेळा वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ (Workout Video) तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे आता जिम बंद पडल्या आहेत आणि त्यामुळेच नेहा वर्कआऊटसाठी जिममध्ये जाऊ शकली नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये वजन कमी करण्यासाठी नेहाला एक अनोखा मार्ग सापडला आहे. ज्याच्या मदतीने ते सहजपणे वजन कमी करून स्वतःला फिट ठेवू शकणार आहे. नेहाने सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे (Nehha Kakkar share parking lot workout video on social media).

नेहा कक्कर हिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती आपल्या कारच्या मदतीने पुशअप करताना दिसत आहे. एवढेच नाही तर, व्हिडीओमध्ये ती पार्किंग लॉटमध्ये जॉगिंग आणि स्ट्रेचिंग करतानाही दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना नेहाने लिहिले की, लॉकडाऊन दरम्यान वाढलेले वजन कमी करण्याची वेळ आली आहे. आता मी ते करू शकते की, नाही ते बघायचे आहे.

पहा नेहा कक्करचा व्हिडीओ

नेहाचा हा वर्कआऊट व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. आतापर्यंत 8 लाखाहून अधिक लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. नेहाचा नवरा रोहनप्रीत याने देखील तिच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. तो म्हणाला, ‘कम ऑन.. तुला माहित आहे तु हे करू शकतेस. तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही (Nehha Kakkar share parking lot workout video on social media).

सध्या नेहा कक्कर ‘इंडियन आयडॉल 12’ या सिंगिग रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसली होती. प्रेक्षकांना तिची सेटवरील मजा आणि स्पर्धकांशी असलेले तिचे खेळीमेळीचे संबंध खूप आवडतात.

या आठवड्यात शोमध्ये दिसणार नाही नेहा!

‘इंडियन आयडॉल 12’च्या या शनिवार-रविवारच्या भागात नेहा कक्कर दिसणार नाहीय. या आठवड्यात जया प्रदा या शोमध्ये खास पाहुणे म्हणून येणार आहेत. नेहा आठवड्यातून केवळ एकच दिवस ‘इंडियन आयडॉल 12’चे शूट करते. पण कोरोना साथीच्या आजारामुळे निर्मात्यांनी एकाच आठवड्यात अनेक एपिसोड शूट करण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे नेहाला इतर गोष्टीना वेळ देता आली नाही. म्हणून आता ती या आठवड्यात ब्रेक घेईल आणि तिची इतर प्रलंबित कामे पूर्ण करेल. त्यानंतर, पुढच्या आठवड्यात ती शोमध्ये परत येईल. लग्नानंतर नेहाचा हा पहिलाच शो आहे. या कार्यक्रमात तिचे देखील खूप कौतुक होत असते.

(Nehha Kakkar share parking lot workout video on social media)

हेही वाचा :

गाणं ऐकून रेल्वेचा अधिकारी म्हणाला, ‘बेटा, रेल मे नोकरी करोगी?’; वाचा, गायिका निशा भगत यांचा किस्सा

अर्जुनच्या ‘त्या’ कृत्यामुळे महानायकासमोर व्हावे लागले खजील, सचिन तेंडुलकरने सांगितला किस्सा…

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI