Dakkhancha Raja Jyotiba : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत सुरु होणार नवा अध्याय, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिबाचा राज्याभिषेक सोहळा

दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत आता नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. (New chapter in Dakkhancha Raja Jyotiba Serial)

  • Updated On - 12:35 pm, Mon, 12 April 21
Dakkhancha Raja Jyotiba : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत सुरु होणार नवा अध्याय,  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिबाचा राज्याभिषेक सोहळा

मुंबई : गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नववर्षाची (Marathi New Year) सुरुवात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी नव्या संकल्पांचा आणि नव्या उपक्रमांचा प्रारंभ होतो. सोबतच तुमच्या आवडत्या मालिकांमध्येही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतही नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. (Dakkhancha Raja Jyotiba’ serial)

दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबाचा राज्यभिषेक सोहळा

गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर ज्योतिबाचा राज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे. आजवर ज्योतिबाच्या कथा-कहाण्या आपण ग्रंथांमधून वाचल्या आहेत. मात्र दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या रुपात ज्योतिबाचं महात्म्य प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळत आहे. गुढीपाडवा विशेष भागातून ज्योतिबाचा भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे.

ज्योतिबाच्या भूमिकेबद्दल विशाल निकम सांगतो…

मालिकेतल्या या भव्यदिव्य राज्यभिषेक सोहळ्याविषयी सांगताना ज्योतिबाची भूमिका साकारणारा विशाल निकम म्हणाला, ‘ज्योतिबाची भूमिका साकारणं हेच मुळात माझ्यासाठी स्वप्नवत आहे. आता मालिकेत ज्योतिबाची राजा व्हायची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्राच्या या लाडक्या दैवताचा राज्याभिषेक होणार आहे. या विशेष भागासाठी आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. भव्यदिव्य सेटसोबतच, नयनरम्य रोषणाई, भरजरी वस्त्र, दुधाचा अभिषेक असा राजेशाही थाट असणार आहे. या भूमिकेच्या निमित्ताने हा सारा थाट मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो आहे. कोरोना काळातल्या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करुन आम्ही हे सीन शूट करत आहोत. आव्हानं खूप आहेत पण ज्योतिबाच्या आशीर्वादाने सगळं निर्विघ्नपणे पार पडत आहे. तेव्हा नक्की पाहा ज्योतिबाचा राज्याभिषेक सोहळा गुढीपाडव्याला म्हणजेच 13 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता.’

विशाल निकमचा फिटनेह मंत्रा

फिट राहण्यासाठी आणि उत्तम लाईफस्टाईलसाठी तुमचे लाडके कलाकार जीम, वर्कआऊट, योगा आणि डान्स यासारख्या अनेक गोष्टी करत असतात. यात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल निकमही मागे नाहीये. ज्योतिबांची भूमिका साकारण्यासाठी विशाल भरपूर मेहनत घेतोय. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत विशाल वर्कआऊट करतो. खरंतर शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नाही त्यामुळे विशालनं चक्क सेटवरच वर्कआऊट करणं सुरू केलं आहे.

भूमिकेसाठी शरीर फिट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे विशालनं हा नवा मार्ग शोधून काढला आहे. सेटवरच्या वस्तूंचा वापर करत त्यानं सेटलाच जीम बनवलं आहे. विशाल शुद्ध शाकाहरी व्यक्ती आहे. त्यामुळे दूध, मोड आलेली कडधान्य, ताज्या भाज्या आणि फळं अश्या सकस आहाराकडे नेहमीच त्याचा कल असतो. सोबत दररोजचा व्यायाम केल्यामुळे विशालला शरीर फिट ठेवणं शक्य झालं आहे.

संबंधित बातम्या

Photo : ‘बापाला आपल्या मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार…’, गश्मीर महाजनी ट्रोलर्सवर बरसला

Priyanka Chopra : ‘आपसे खुबसुरत आपके अंदाज हैं’, प्रियांका चोप्राच्या या फोटोंची एकच चर्चा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI