राजकुमार-भूमीची कहाणी सुरु, आपणही ‘बधाई’साठी रहा तयार!

2018 प्रदर्शित झालेला बधाई हो (Badhaai ho) चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट झाला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

राजकुमार-भूमीची कहाणी सुरु, आपणही 'बधाई'साठी रहा तयार!
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 05, 2021 | 6:28 PM

मुंबई : 2018 प्रदर्शित झालेला बधाई हो (Badhaai ho) चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट झाला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आज चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. राजकुमार रावने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन शूटिंग सुरू होत असल्याची माहिती दिली आहे. तसेच, चाहत्यांना म्हणाला आहे की, बधाई हो साठी सज्ज व्हा. (new film by Rajkumar Rao and Bhoomi Pednekar)

भूमि पेडणेकर आणि दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना राजकुमार रावने लिहिले की, आमची कहाणी सुरू झाली आहे, राजा आणि राणी दोघे आहेत. शार्दुल आणि सुमीसोबत आहेत. लवकरच भेटू राजकुमार रावने या चित्रपटासाठी फिटनेसवर विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटात राजकुमार राव दिल्ली पोलिस कर्मचाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. एक महिला पोलिस ठाण्यात एकमेव पुरुष पोलिस असणार आहे. आपल्या भूमिकेविषयी राजकुमार म्हणाला होता की, बधाई हो हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे.

भूमी पेडणेकरच्या ‘दुर्गामती’ या चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती दणदणीत भूमिकेत दिसली आहे. तिच्या या चित्रपटामध्ये माही गिलही एका विशेष भूमिकेत दिसत आहे. दुर्गामती चित्रपट अक्षय कुमार निर्मित आहे. पूर्वी या चित्रपटाचे नाव दुर्गावती असे होते परंतु ते बदलून दुर्गामती करण्यात आले होते. अक्षयला चित्रपट लक्ष्मी बॉम्बसारख्या कोणत्याही वादात पडायचे नसल्यामुळे अक्षयने चित्रपटाचे नाव बदलून घेतले होते. दुर्गामती हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी अॅमॅझोन प्राईमवर रिलीज झाला होता.

संबंधित बातम्या :

कंगनाचा शशी थरुर यांच्यावर निशाणा, ‘आमच्या प्रेमाला पैशाने खरेदी करण्याचा प्रयत्न करु नका!’

Scoop | आयुष्मान खुराना मुंबईत दाखल, लवकरच करणार नवीन चित्रपटाची घोषणा!

(new film by Rajkumar Rao and Bhoomi Pednekar)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें