AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देऊळ बंद 2मधून चाहत्यांना मोठं सरप्राईज, थेट प्रविण तरडेंची बायको महत्त्वाच्या भूमिकेत

प्रविण तरडेचे मास्टरमाईंड दिग्दर्शन आणि मोहन जोशींचे 'स्वामी' रूप; 'देऊळ बंद 2'चा पोस्टर रिलीज. पोस्टर पाहून चाहते म्हणाले प्रचंड गर्दी होणार.

देऊळ बंद 2मधून चाहत्यांना मोठं सरप्राईज, थेट प्रविण तरडेंची बायको महत्त्वाच्या भूमिकेत
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 15, 2026 | 7:29 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘देऊळ बंद 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 21 मे 2026 जाहीर झाल्यानंतर स्वामीभक्त आणि चित्रपटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘देऊळ बंद 2’ च्या पहिल्या पोस्टरमध्ये एक वेगळाच भावनिक आणि आध्यात्मिक पैलू पाहायला मिळतो. पोस्टरमध्ये स्वामी समर्थ प्रसन्न मुद्रेत हात वर करून आशीर्वाद देताना दिसत आहेत. ते दुचाकीवर मागे बसलेले असून, अभिनेत्री स्नेहल तरडे दुचाकी चालवत आहे.

विशेष म्हणजे, स्वामींच्या चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता दिसत असताना स्नेहल तरडेच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यांत अश्रू दिसत आहेत. या विरोधाभासामुळे कथा नेमकी कशावर आधारित आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुन्हा एकदा मोहन जोशी ‘स्वामी’ रूपात

पहिल्या भागात आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या दमदार आवाज आणि अभिनयामुळे प्रेक्षकांना स्वामी प्रत्यक्ष समोर असल्याचा भास होतो आणि हाच अनुभव या दुसऱ्या भागातही मिळणार आहे.

पहिल्या भागात स्वामींचा प्रवास आलिशान गाडीतून दाखवण्यात आला होता तर या भागात ते एका सामान्य महिलेच्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसतात. यामधून भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी असतात हा संदेश अधोरेखित केला जातो. या वेळी कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरताना दिसणार असून, स्वामीकृपेने त्यांच्या आयुष्यात घडणारे बदल दाखवले जाणार आहेत.

दिग्दर्शन आणि निर्मिती

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रवीण तरडे यांनी केले आहे. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली असून, Vatvruksha Entertainment या बॅनरखाली हा चित्रपट साकारला गेला आहे.

देऊळ बंद 2 च्या पोस्टरनेच चित्रपटाची झलक देत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आध्यात्मिकता, भावनिकता आणि वास्तववादी कथा यांचा संगम असलेला हा चित्रपट 21 मे 2026 रोजी प्रदर्शित होत असून तो बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत!
Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा
महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला
Maharashtra MLC Election Results 2026 : महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला? निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार