AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो तर प्रतिभावान…सुनील शेट्टींनी केले मुलाचे कौतुक, News9 Global Summit म्हणाले, त्याच्यासोबत चित्रपट करणार

News9 Global Summit 2025 : न्यूज9 ग्लोबल समिट 2025 च्या विशेष सत्रात सिनेमॅटिक इन्व्हेस्टरमध्ये सुपरस्टार सुनील शेट्टी हजर राहिला. त्याने उपस्थितांची मनं जिंकली. त्याने मुलगा अहान शेट्टीवर कौतुकाचा पुल बांधला. त्याने दाक्षिणात्य सिनेमा आणि बॉलिवूडच्या तुलनेवर पण मत मांडले.

तो तर प्रतिभावान...सुनील शेट्टींनी केले मुलाचे कौतुक, News9 Global Summit म्हणाले, त्याच्यासोबत चित्रपट करणार
दक्षिण की बॉलिवूड, कोण बाप?Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 20, 2025 | 3:15 PM
Share

न्यूज9 ग्लोबल समिट 2025 मध्ये जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक स्टार या कार्यक्रमात उपस्थित होते. सुपरस्टार सुनील शेट्टी यांनी या सोहळ्याला चार चांद लावले. त्याने उपस्थितांची मनं जिंकली. त्याने मुलगा अहान शेट्टीवर कौतुकाचा पुल बांधला. त्याने दाक्षिणात्य सिनेमा आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये सध्या तुलना करण्यात येते. त्यावर त्याने बिनधास्त मत मांडले. न्यूज9 ग्लोबल समिट 2025 च्या विशेष सत्रात सिनेमॅटिक इन्व्हेस्टरमध्ये सुनील शेट्टी यांच्या बेधडक उत्तरांना उपस्थितांनी दाद दिली.

अहान शेट्टीविषयी काय म्हणाले सुनील शेट्टी?

सुनील शेट्टीने द सिनेमॅटिक इन्व्हेस्टर या खास सत्रात हजेरी लावली. त्याने चित्रपट आणि त्यासंबंधीत विविध विषयावर थेट मतं मांडली. हे जाहिरातीचे युग आहे. यशस्वी ब्रँडलाच एंडोर्स करण्यात येते. मान्यता देण्यात येते असे त्याने स्पष्ट केले. प्रत्येक माणूस, कलाकार सेफ गेम खेळू इच्छितो. सर्वच बॅनर्स काम करत आहेत. पण आता अनेक लोक स्क्रिप्टवर काम करताना दिसत नाहीत. जर तुम्ही पटकथा लिहून ठेवाल तर ती तशीच पडून राहील. तुम्हाला प्रत्यक्षात ती चित्रपटाच्या रुपाने उतरावी लागेल. आपणही चित्रपटात गुंतवणूक करण्याविषयी सकारात्मक असल्याचे सुनील शेट्टी म्हणाला. जर तुमचे संबंध चांगले असतील तर गुंतवणुकीतून फायदा होईलच असे मत त्याने मांडले.

मुलाविषयी अण्णाला कौतुक

माझा पण एक मुलगा आहे. तो बॉलिवूडमध्ये करिअर करत आहे. तो त्याचा दुसरा चित्रपट बॉर्डर 2 करत आहे. मला त्याचा प्रतिभा ठासून भरल्याचे दिसते. मी त्याला चित्रपटात संधी देऊ इच्छितो. त्याच्यासाठी एक सिनेमा काढू इच्छितो. ज्या कलाकारांवर मला विश्वास आहे, त्या सर्वांसोबत मी काम करू इच्छितो. जर तुमच्याकडे तुमची योग्य किंमत असेल तर तुम्हाला ती वसूल करता येते. ती किंमत मिळवता येते.

बॉलिवूड की दक्षिण चित्रपट?

सुनील शेट्टी यांच्याशी चर्चे दरम्यान बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटाच्या तुलनेचा विषय निघाला. त्यावर सुनील शेट्टीने त्याचे प्रांजळ मत मांडले. आजच्या घडीला आपण कुठे चाललो आहोत, हे मला माहिती नाही. कोणत्याही इंडस्ट्रीजचा सिनेमा जर आजच्या तारखेला चालत असेल तर ते बॉलिवूडशी तुलना करत आहेत. या इंडस्ट्री स्वत:ला बॉलिवूडपेक्षा मोठे दाखवत आहेत. मोठे भासवत आहेत. पण एक खरं खरं सांगू का? बॉलिवूडच सर्वांचा बाप आहे. हिंदी सिनेमाच सर्वांचा बाप आहे. ही अशी भाषा आहे जी सर्वदूर बोलली जाते.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.