AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: बीफ खाणारा रणबीर श्रीराम यांच्या भूमिकेत नकोच..; अभिनेत्रीचा संताप, जाहीर माफीची मागणी

Ranbir Kapoor: बीफ खाणारी व्यक्ती प्रभू श्रीराम यांची भूमिका कशी साकारू शकते, असा सवाल करत अभिनेत्रीने माफीची मागणी केली आहे. अन्यथा रणबीरवर बंदी घालण्याची मोहीम सुरू ठेवण्याचा इशारा दिला.

Ramayana: बीफ खाणारा रणबीर श्रीराम यांच्या भूमिकेत नकोच..; अभिनेत्रीचा संताप, जाहीर माफीची मागणी
Ranbir Kapoor in Ramayana Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 06, 2026 | 9:33 AM
Share

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहीजण त्याच्या निवडीचं कौतुक करत आहेत, तर काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यादरम्यान अभिनेत्री निकिता रावलने रणबीरच्या निवडीला थेट विरोध करत त्याच्या माफीची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास सोशल मीडियावर त्याच्याविरोधात ट्रेंड सुरू ठेवणार असल्याचा इशाराच तिने दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निकिताने रणबीरच्या जुन्या वक्तव्याचाही उल्लेख केला, ज्यामध्ये त्याने बीफ म्हणजेच गोमांस खाल्ल्याची कबुली दिली होती.

‘बॉलिवूड मॅस्कॉट’ला दिलेल्या या मुलाखतीत निकिता म्हणाली, “रणबीरने लाखो लोकांच्या भावनांशी खेळ केला आहे. तो म्हणतोय, मी गोमांस खातो आणि तरीही तो श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. त्याच्यावर थेट बहिष्कारच घालावा. मी #BoycottRanbirKapoor ही मोहीम सुरूच ठेवीन. जर त्याला त्याच्याकडून थोडी जरी चूक झाली आहे, असं वाटत असेल तर त्याने पुढे येऊन त्या लाखो लोकांची माफी मागावी. होय माझ्याकडून चूक झाली, हे त्याने मान्य करावं. आम्ही त्याला माफ करू. जोपर्यंत रणबीर माफी मागत नाही, तोपर्यंत मी त्याच्यावर बहिष्कार टाकेन. त्याचं वैयक्तिक चारित्र्य प्रभू श्रीराम यांच्या चारित्र्याला न्याय देत नाही. या निर्माते फक्त व्यवसायाचा विचार करत आहेत. जो माणूस उघडपणे सांगतोय की तो गोमांस खातो, त्याला ही भूमिका देणं हा लाखो लोकांच्या श्रद्धेचा, भावनांचा आणि प्रभू श्रीराम यांचाही अपमान आहे. आता सर्व सनातनी सदस्य कुठे आहेत? आता कोणी आवाज का उठवत नाही?”

‘रामायण’मधील श्रीराम यांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरने मद्यपान आणि मांसाहार सोडून दिल्याचं म्हटलं गेलंय. पण जवळपास 15 वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रणबीरने बीफ खाण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. “मला बीफ खायला खूप आवडतं. मी बदकाचंही मांस खाल्लं आहे. मटण, पाया हेसुद्धा मला खूप आवडतात”, असं त्याने म्हटलं होतं.

‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच साई पल्लवी, यश, सनी देओल, अरुण गोविल, लारा दत्ता, विवेक ओबेरॉय, रवी दुबे, रकुल प्रीत सिंह यांच्याही भूमिका आहेत. तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!