AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nita Ambani | ‘मुलांची आजी आहेस, आई होण्याचा प्रयत्न…’, नीता अंबानींना मुलगा असं का म्हणला?

Nita Ambani | अंबानी कुटुंबाच्या सर्वत्र रंगत असतात चर्चा... इतरांप्रमाणे अंबानी यांच्या घरात देखील चिमुकल्यांमुळे उडतात खटके? नीता अंबानी यांनी मुलगा थेट म्हणाला, मुलांची आजी आहेस, आई होण्याचा प्रयत्न...'

Nita Ambani | 'मुलांची आजी आहेस, आई होण्याचा प्रयत्न...', नीता अंबानींना मुलगा असं का म्हणला?
| Updated on: Mar 09, 2024 | 2:45 PM
Share

मुंबई | 9 मार्च 2024 : गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडींग सेलिब्रेशनमुळे चर्चेत आहेत. दोघांच्या प्री-वेडिंगसाठी फक्त सेलिब्रिटी नाहीतर, जगभरातून असंख्य दिग्गज व्यक्तींनी त्यांच्या प्री-वेडींग सेलिब्रेशनसाठी हजेरी लावली. सोशल मीडियावर देखील प्री-वेडींग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण अंबानी कुटुंब फक्त त्यांच्या व्यवसायामुळे आणि कार्यक्रमांमुळे नाहीतर, इतर कारणांमुळे देखील चर्चेत असतं. एका मॅगझिनच्या मुलाखतीत नीता अंबानी यांनी आजीच्या भूमिकेत असल्यानंतर येणाऱ्या अनुभवांबद्दल वक्तव्य केलं.

नीता अंबानी म्हणाल्या, ‘मला माझा मोठा मुलगा आकाश अंबानी नेहमी त्यांना सांगतो तू आजी आहेस आई होऊ नकोस… मुलांवर आजी म्हणून प्रेम कर. मला स्वतःला आता असं वाटतं की, मला आता माझ्या मुलांना त्यांचं मुलांचा सांभाळ करण्यासाठी स्पेस दिली पाहिजे… मला माझ्या नातवंडांवर आई म्हणून नाही तर, आता आजी म्हणून प्रेम करायचं आहे..’

‘नातवंडांवर मला फक्त प्रेम करायचं आहे. त्यांना धाकात ठेवण्याचं काम त्यांच्या आई-वडिलांचं आहे. माझी मुलं लहान असताना मला प्रचंड काळजी वाटायची. मुलं कायम मोठ्यांचं अनुकरण करत असतात. मला वाटतं की आजी या नात्याने घरातील चिमुकल्यांना मूल्ये शिकवणे ही माझी जबाबदारी आहे.’ असं देखील नीता अंबानी म्हणाल्या..’

नीता अंबानी यांच्या नातवंडांबद्दल सांगायचं झालं तर, पृथ्‍वी, कृष्‍णा, आदिया आणि वेदा… अशी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या नातवंडांची नावे आहेत. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या मुलांची नावं पृथ्वी आणि वेदा अशी आहेत. तर ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या मुलांची नावे कृष्‍णा आणि आदिया अशी आहेत.

नीता अंबानी कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता नीता – मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंद अंबानी यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. अनंद – राधिका यांचं लग्न 12 जुलै रोजी होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब