AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Desai यांच्या मृत्यूचं मोठं कारण समोर; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

चार डॉक्टरांच्या टीमकडून नितीन देसाई यांचा पोस्टमार्टम पूर्ण; रिपोर्टमधून धक्कादायक कारण समोर... देसाई यांच्या निधनानंतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये खळबळ

Nitin Desai यांच्या मृत्यूचं मोठं कारण समोर; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
| Updated on: Aug 04, 2023 | 8:03 AM
Share

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनानंतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र नितीन देसाई यांच्या निधनाची चर्चा सुरु आहे. नितीन देसाई यांनी टोकाचा निर्णय का घेतला? त्यांच्यावर असलेलं कर्ज? त्यांच्या मनात सुरु असलेली घालमेल? अशा अनेक चर्चा नितीन देसाई यांच्या निधनानंतर सुरू आहे. माहितीनुसार, नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळ ४.३० च्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं आहे. पोलीस देखील प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. पण आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं. अशी माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट देखील समोर आले आहेत. चार डॉक्टरांच्या टीमकडून नितीन देसाई यांचा पोस्टमार्टम पूर्ण झाला आहे.

नितीन देसाई यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये स्वतःला संपवलं. निधनानंतर चार डॉक्टरांच्या टीमने पोस्टमार्टम प्रक्रिया पूर्ण केली आहे. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की, ‘दिग्दर्शक नितीन देसाई यांचं चार डॉक्टरांच्या टीमने पोस्टमॉर्टम केलं आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचं कारण गळफास असल्याचं समोर येत आहे. पुढील तपास सुरू आहे.’ सध्या सर्वत्र नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं? अशी चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला. बुधवारी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, “त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले आहे की, त्यांचे अंत्यसंस्कार एनडी स्टुडिओमध्ये होणार आहेत. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आला आहे.”

नितीन देसाई यांनी १९८९ मध्ये ‘परिंदा’ सिनेमातून त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सिनेमांमध्ये नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शनाची भूमिका बजावली. एवढंच नाहीतर, ‘देवदास’, ‘खामोशी’ सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

बेस्ट कलादिग्दर्शक म्हणून नितिन देसाई यांनी चारवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २० वर्षांपेक्षा अधिक काळ नितीन देसाई यांनी कलाविश्वात काम केलं आहे. नितीन देसाई यांनी संजय लिला भंसाळी, विधु विनोद चोप्रा, राजकुमारर हिरानी, आशुतोष गोवारिकर यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत नितीन देसाई यांनी काम केलं आहे. अशात त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न