AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या आयुष्यातील हिरो आता..’ अशोक सराफ यांना पद्मश्री मिळाल्यानंतर निवेदिता सराफ यांची खास पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

'माझ्या आयुष्यातील हिरो आता..' अशोक सराफ यांना पद्मश्री मिळाल्यानंतर निवेदिता सराफ यांची खास पोस्ट
निवेदिता सराफ यांची खास पोस्टImage Credit source: social media
| Updated on: May 30, 2025 | 9:57 AM
Share

मराठी तसेच हिंदी चित्रपसृष्टीत, मालिका आणि नाटकांमध्येही आपल्या खणखणती अभिनयाने , गेल्या कित्येक वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 27 मे रोजी पद्म पुरस्कार 2025 च्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांचा सन्मान झाला. त्यावेळी कला, सामाजिक कार्य आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी अनेक नामवंत व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याचवेळी अशोक सराफ यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं.

अतिशय अभिमानास्पद अशा या गौरवानंतर मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, मान्यवरांनी, राजकारणी, लेख, सर्वच क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींनी अशोक मामांचे अभिनंदन करत त्यांना या सन्मानासाठी शुभेच्छाही दिल्या. मात्र या सर्वात एका खास पोस्टने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशोक सराफ यांच्या पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदित सराफ यांनीही सोशल मीडियावर दोघांचा एक सुंदर, सुहास्य मुद्रेचा फोटो पोस्ट करत अशोक सराफ यांच्यासाठी स्पेशल पोस्टही केली आहे. पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांनी अशोक सराफ यांचे खास अंदाजात कौतुक केलं.

माझ्या आयुष्यातला हिरो, आता देशाचाही अभिमान

निवेदित सराफ यांनी इन्स्टाग्रामवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर ही स्पेशल पोस्ट केली आहे. पद्म पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर, काल निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो त्यांच्या अकाऊंटवर टाकला आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, तसेच जाकीट घातलेले अशोक मामा आणि त्यांच्या शेजारी केशरी रंगाच्या साडीत सुरेख दिसणाऱ्या, सुहास्य मुद्रेने फोटोसाठी पोझ देणाऱ्या निवेदिता सराफ… दोघांचाही हा फोटो पाहून आपल्या चेहऱ्यावरही नकळत हसू येतं. या फोटोसोबत निवेदिता यांनी काही खास ओळीही लिहील्या असून अशोक सराफ यांचं अभिनंदनही केलं.

” हा क्षण शब्दात मांडता येणार नाही असा… तुझा प्रत्येक प्रवास, प्रत्येक टप्पा साक्षी आहे तुझ्या मेहनतीचा, तुझ्या समर्पणाचा. माझ्या आयुष्यातला हिरो, आता देशाचाही अभिमान!🎖️ माझा अभिमान अनंत पटीने वाढला!! खूप खूप अभिनंदन… ” असे कौतुकाचे शब्द लिहीत त्यांनी या फोटोत अशोक सराफ यांना टॅग केलंय.

जानेवारी महिन्यातच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावेळीही माध्यमांशी बोलताना निवेदिता सराफ यांनी आनंद व्यक्त केला होता.

Follow Us
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?