सलमान खानच्या को-एक्ट्रेसचा खळबळजनक खुलासा, ‘मी लहान असताना…’
अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील धक्कादायक घटनेविषयी माहिती दिली. "मी सकाळी शाळेत जात असताना रिक्शाची वाट पाहत होती. यावेळी रस्त्यावर एका माणासाने मला त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवला होता. या घटनेमुळे मी सुन्न झाली होती तसेच मी अनेक वर्ष या घटनेमुळे स्वत:लाच दोष देत राहिली. शिक्षकांनी सांगितल्यानुसार, मला वाटत होतं की माझीच चूक आहे", असं अभिनेत्री म्हणाली.

कोलकातामध्ये एका रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या घटनेवर बॉलिवूड कलाकारही भूमिका मांडत आहेत. बॉलिवूड कलाकारांकडूनही या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय. या दरम्यान अभिनेता सलमान खान याच्या एका चित्रपटातील को-स्टार असलेली अभिनेत्री सेलिना जेटली हिने तिचा लहानपणीचा अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा अनुभव वाचून अनेकांना धक्का बसला आहे. सेलिना जेटली ही अभिनेत्री मनमोकळेपणाने आपली भूमिका सोशल मीडियावर मांडत असते. सेलिना चित्रपटसृष्टीपासून सध्या दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. सेलिना आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. त्यावर तिचे चाहते नेहमी प्रतिक्रिया देतात आणि लाईकही करतात. नुकतंच सेलिनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबाबत असा खुलासा केला आहे, ज्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
सेलिना जेटली हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सविस्तर भूमिका मांडली आहे. सेलिनाने इयत्ता सहावीत असतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत मत मांडताना सेलिनाने खुलासा केला की, ती लहान असताना एका इसमाने तिला प्रायव्हेट पार्ट दाखवला होता. विशेष म्हणजे या भयावह घटनेत सेलिना हिलाच दोषी ठरवण्यात आलं. त्यामुळे सेलिना हिच्या मनाला त्या वयात अपराधीपणाची भावना टोचत होती. सेलिना हिने सांगितलेल्या या अनुभवामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
सेलिना नेमकं काय म्हणाली?
सेलिनाने आपल्या पोल्टमध्ये सांगितलं की, “माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगाला शिक्षकांनी मलाच दोषी ठरवलं. ती माझी चूक होती कारण मी जास्त वेस्टनाईज आणि मॉर्डन आहे. मी सैल कपडे घालत नाही आणि केसांना तेल लावून दोन वेण्या देखील बांधत नाही.” सेलिना हिने आपल्या आयुष्यातील आणखी धक्कादायक घटनेविषयी माहिती दिली. “मी सकाळी शाळेत जात असताना रिक्शाची वाट पाहत होती. यावेळी रस्त्यावर एका माणासाने मला त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवला होता. या घटनेमुळे मी सुन्न झाली होती तसेच मी अनेक वर्ष या घटनेमुळे स्वत:लाच दोष देत राहिली. शिक्षकांनी सांगितल्यानुसार, मला वाटत होतं की माझीच चूक आहे”, असंही सेलिना पोस्टमध्ये म्हणाली.
View this post on Instagram
‘मुलांनी ब्रेकची वायर कापली’
सेलिनाने सांगितलं की, जेव्हा ती अकरावीत शिक्षण घेत होती तेव्हा तिच्या कॉलेजच्या मुलांनी तिच्या स्कुटीच्या ब्रेकची वायर कापून टाकली होती. जे लोक आपल्यासोबत गैरवर्तवणूक करतात त्यांच्यासोबत आपण बोलत नव्हतो. त्यामुळे त्यांनी असाप्रकार केल्याचं सेलिनाने सांगितलं. ही मुलं सेलिना यांना सारखा त्रास द्यायचे. याबद्दल आपण शिक्षकांनासुद्धा तक्रार केली. तेव्हा शिक्षक काय म्हणाले याबाबतही सेलिनाने सांगितलं आहे. “माझ्या वर्गशिक्षकाने मला बोलावलं आणि सांगितलं की, तू फॉरवर्ड विचारसरणीची आहे. क्लासमध्ये जिन्स परिधान करतेस, त्यामुळे मुलांना वाटतं की, तू लूझ कॅरेक्टरची आहेस. नेहमी माझीच चूक असायची”, असं सेलिनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘आजोबांची खिल्ली उडवली, पण आता सहन करायचं नाही’
सेलिना म्हणते की, “मला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी मी स्वत:ला वाचवण्यासाठी स्कूटवरुन उडी मारली होती. कारण माझ्या स्कुटीची वायर कापून घेतली होती. त्यावेळी मला खूप दुखापतही झाली होती. पण माझीच चूक होती. माझे निवृत्त कर्नल आजोबा देशासाठी दोन वेळा युद्ध लढले होते. ते मला शाळेत सोडायला आणि घ्यायला जायचे. मुलं त्यांनासुद्धा सोडायचे नाहीत. ते माझ्या आजोबांची खिल्ली उडवायचे. माझे आजोबा उभे राहून त्यांच्याकडे रागात पाहायचे. ज्या लोकांसाठी त्यांनी एकेकाळी जीवाची बाजी लावली त्याच लोकांकडे ते रागाने पाहत होते. पण आता योग्य वेळ आली आहे. आपण आता उभं राहायला हवं, आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी उभं राहायला हवं. आमची चूक नाही. किती मुली या गोष्टीला सहमत आहेत?”, असा सवाल सेलिना यांनी केला.
