AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना हिरो, ना विलेन.. तरी सुपरहिट आहेत हे 7 वेब सीरिज; काहींना तर सर्वाधिक IMDb रेटिंग

या सातही सीरिजची खासियत एकच.. कथा मोठी करण्यासाठी मोठ्या घटनांची गरज नसते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या गोष्टीही योग्य पद्धतीने सांगितल्या तर त्या प्रेक्षकांच्या मनाला भिडू शकतात. त्यामुळेच या सीरिजमधील पात्रं काल्पनिक वाटत नाहीत, तर आपल्या घरातील, शेजारच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींसारखी वाटतात.

ना हिरो, ना विलेन.. तरी सुपरहिट आहेत हे 7 वेब सीरिज; काहींना तर सर्वाधिक IMDb रेटिंग
वेब सीरिजImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 06, 2026 | 1:04 PM
Share

ओटीटीवर सध्या मोठमोठे स्टार्स, भव्य सेट आणि थरारक कथांपेक्षा रोजच्या आयुष्यातील साध्या-सोप्या गोष्टी प्रेक्षकांना अधिक भावताना दिसत आहेत. घरातील भांडणं, पैशांवरून होणारी चर्चा, नोकरीची चिंता, लग्नाचे विषय, गावातील राजकारण किंवा स्वतःचं घर उभं करण्याचं स्वप्न.. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून काही वेब सीरिजनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या कथांमध्ये नेहमीचा सुपरहिरो किंवा खलनायक नसतानाही त्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत.

1. गुल्लक

‘गुल्लक’ ही अशाच मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा आहे, जिथे मोठ्या घटनांपेक्षा रोजच्या आयुष्यातील छोट्या प्रसंगांना महत्त्व दिलं जातं. मिश्रा कुटुंबातील पैशांवरून होणाऱ्या चर्चा, भाऊ-भावांमधील कुरबुरी, पालकांचं मुलांवरचं प्रेम आणि घरातील छोट्या-मोठ्या समस्या प्रेक्षकांना आपल्याच कुटुंबाची आठवण करून देतात. या सीरिजचे आतापर्यंत पाच सिझन आले आहेत.

2. पंचायत

‘पंचायत’मध्ये एका शहरातून गावात आलेल्या सचिवाची आणि तिथल्या लोकांची गोष्ट पाहायला मिळते. गावातील एखादा रस्ता, निवडणूक किंवा अगदी छोटासा वादही तिथल्या लोकांसाठी किती महत्त्वाचा असू शकतो, हे या सीरिजमधून विनोदी आणि भावनिक पद्धतीने दाखवलं जातं. सचिवजी, प्रधानजी आणि प्रह्लाद चा यांसारखी पात्रं प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहेत. या सीरिजचे चार सिझन प्रदर्शित झाले आहेत.

3. दुपहिया

‘दुपहिया’ची कथा धडकपूरच्या पार्श्वभूमीवर घडते. इथली पात्रं जग वाचवण्याच्या मोहिमेवर नसतात, तर स्वतःच्या छोट्या-छोट्या अडचणी सोडवण्यात व्यस्त असतात. अमावस, बनवारी आणि गावातील इतर व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आयुष्यातील विनोद आणि संघर्ष दाखवला जातो. त्यामुळे ही सीरिजही प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटते.

4. ये मेरी फैमिली

बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारी ‘ये मेरी फैमिली’ ही सीरिज एका सामान्य भारतीय कुटुंबातील वातावरण दाखवते. घरातील नातेसंबंध, मुलांचे प्रश्न, पालकांशी होणारे मतभेद आणि बालपणीचे छोटे आनंद या कथेत दिसतात. वेगवेगळ्या सीझनमध्ये कुटुंब आणि कलाकार बदलले असले तरी मालिकेचा मूळ भाव कायम राहिला आहे.

5. होम शांती

प्रत्येक सामान्य कुटुंबाचं स्वतःचं घर असावं, हे स्वप्न असतं. ‘होम शांती’ याच स्वप्नाभोवती फिरते. घर बांधताना येणाऱ्या आर्थिक अडचणी, कुटुंबातील वेगवेगळ्या पिढ्यांच्या अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे मजेशीर प्रसंग या सीरिजमध्ये पाहायला मिळतात.

6. द आम आदमी फॅमिली

नावाप्रमाणेच ही एका अगदी सामान्य कुटुंबाची कथा आहे. पालक, मुलं, त्यांच्यातील गैरसमज, पिढ्यांमधील अंतर आणि घरातील रोजच्या कुरबुरी यामध्ये मोठा ड्रामा नसला तरी प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याची झलक दिसते.

7. घर वापसी

नोकरी गमावल्यानंतर बंगळुरूहून आपल्या शहरात परतणाऱ्या तरुणाची कथा ‘घर वापसी’मध्ये दाखवली आहे. करिअरमधील अपयशातून सुरू झालेला हा प्रवास पुढे कुटुंब, ओळख, अपेक्षा आणि यशाचा खरा अर्थ समजून घेण्याची गोष्ट बनतो.

Follow Us
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका