AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फरीदा जलाल यांच्याकडून शिवीगाळ; चाहत्यांना बसला धक्का, म्हणाले ‘बालपण खराब..’

विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'ओ रोमियो' या चित्रपटाच्या टीझरमधील एका दृश्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. आपल्या प्रेमळ भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यामध्ये थेट शिवी देताना दिसत आहेत.

फरीदा जलाल यांच्याकडून शिवीगाळ; चाहत्यांना बसला धक्का, म्हणाले 'बालपण खराब..'
Farida Jalal and Shahid KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 11, 2026 | 12:04 PM
Share

दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या ‘ओ रोमियो’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शनिवारी या चित्रपटाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. त्यातही ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ‘ओ रोमियो’च्या टीझरमध्ये अॅक्शन, स्टाइल आणि स्वॅग यांचा भरणा होता. परंतु यात काही आक्षेपार्ह भाषाही वापरण्यात आली आहे. टीझरमधील काही सीन्समध्ये सर्रास शिवीगाळ ऐकायला मिळते. अभिनेता शाहिद कपूर तर सुरुवातीलाच त्या अंदाजात बोलताना दिसला. परंतु प्रेक्षकांना खरा धक्का तेव्हा बसला, जेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या तोंडीही त्या शिव्या ऐकायला मिळाल्या. सध्या असे संवाद सर्वसामान्य असले तरी फरीदा जलाल यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्यांच्या भूमिकेला असे संवाद दिल्याने प्रेक्षक अवाक् झाले आहेत.

‘ओ रोमियो’च्या टीझरमध्ये एक सीन आहे, जेव्हा फरीदा जलाल प्रेमाचा अर्थ समजावत असतात. या संवादाच्या शेवटी त्या शिवी देतात. हा सीन पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या या सीनवर स्पष्ट नाराजी कोणी व्यक्त केली नसली तरी सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा होत आहे. इन्स्टाग्रामवर त्यांच्या या सीनचे क्लिप्स व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘बॉलिवूडमध्ये माझ्या बालपणीच्या आठवणीच उद्ध्वस्त केल्या आहेत. यांनी तर सर्वांत प्रेमळ फरीदा जलाल यांच्या तोडींची शिव्यांचा डायलॉग दिला’, असं एकाने लिहिलं. तर ‘फरीदा जलाल यांनी कॅमेरासमोर शिवी देणं हे माझ्या 2026 च्या बिंगो कार्डमध्ये नव्हतंच’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

‘ओ रोमियो’ हा चित्रपट येत्या 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये शाहिद कपूर, फरीदा जलाल यांच्यासोबतच तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया, विक्रांत मेस्सी आणि नाना पाटेकर यांच्या भूमिका आहेत. या टीझरची सुरुवात शाहिदच्या एका दृश्याने होते. बोटीवर ‘छोटू’ म्हणून हाक मारताना त्याचा संयम सुटतो. काऊबॉय हॅट, काळी बनियान, शरीरावर टॅटू, ज्वेलरी असा त्याचा हटके लूक यात पहायला मिळतो. टीझरमध्ये नाना पाटेकर, दिशा पटानी, विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया आणि अविनाश तिवारी यांच्या पात्रांचीही झलक दाखवण्यात आली आहे. याशिवाय चित्रपटात अरुणा इराणी, हुसेन दलाल, रेश लांबा आणि राहुल देशपांडे यांच्याही भूमिका आहेत.

नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले.
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान.
भाजपच्या प्रचारासाठी मैथिली ठाकूर मुंबईत; गायलं मराठी गाणं
भाजपच्या प्रचारासाठी मैथिली ठाकूर मुंबईत; गायलं मराठी गाणं.