AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oppenheimer | ‘ओपनहायमर’मधील भगवद् गीतेच्या सीनवरून मोठा वाद; चित्रपट पाहिल्यानंतर भडकले नेटकरी

1930 आणि 40 च्या दशकात अणुबॉम्ब तयार करण्याचा अमेरिकेच्या गुप्त ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’वर या चित्रपटाची कथा आधारित आहे. शास्त्रज्ञ रॉबर्ट जे ओपनहायमर यांच्या नजरेतून ही कथा सांगितली जात आहे. ते अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जातात. 

Oppenheimer | 'ओपनहायमर'मधील भगवद् गीतेच्या सीनवरून मोठा वाद; चित्रपट पाहिल्यानंतर भडकले नेटकरी
Cillian Murphy in OppenheimerImage Credit source: Youtube
| Updated on: Jul 21, 2023 | 1:38 PM
Share

मुंबई | 21 जुलै 2023 : जगप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ओपनहायमर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यावरून विविध प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. सिलियन मर्फीने यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. यातील कलाकारांचं अभिनय, दिग्दर्शन आणि धमाकेदार सीन्स प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. मात्र ‘ओपनहायमर’मधील एक सीन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. या सीनमध्ये भगवद् गीतेच्या वापरावरून नेटकरी भडकले आहेत.

ओपनहायमरमध्ये अभिनेता आणि त्याच्या प्रेयसीचा एक इंटिमेट सीन दाखवला आहे. यावेळी त्याची प्रेयसी अभिनेत्याला भगवद् गीतेतील एक श्लोक वाचण्यास सांगते. त्यावरून आता नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘आताच ओपनहायमर पाहून आलो. यातील एका सीनमध्ये नग्न महिलेच्या हातात भगवद् गीता असते आणि ती ओपनहायमरला श्लोक वाचण्यास सांगते. मी अजूनही धक्क्यात आहे. अशा सीनमध्ये धार्मिक पुस्तक वापरण्याची काय गरज होती’, असा सवाल एकाने केला. तर ‘तुम्ही सनातनी असाल आणि भगवद् गीतेच्या संदर्भासाठी ओपनहायरम हा चित्रपट पाहायला जात असाल तर नका जाऊ’, असा सल्ला दुसऱ्या युजरने दिला.

कलाकारांच्या इंटिमेट सीनदरम्यान भगवद् गीतेच्या वापराची काहीच गरज नव्हती, असं मत अनेकांनी मांडलं. या सीनवरून सनातन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळेच चित्रपटावरून वाद सुरू आहे. मात्र असेही काही नेटकरी आहेत, ज्यांना यात काहीच चुकीचं वाटत नाही. ‘चित्रपटात भगवद् गीतेचा सीन आहे पण त्यात कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक ग्रंथाचा अपमान करण्याचा हेतू होता असं मला वाटत नाही. तुम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला तर तुम्हाला नक्कीच कारण समजेल’, असं एका युजरने म्हटलंय.

‘ओपनहायमर’ या हॉलिवूड चित्रपटाची क्रेझ भारतातही खूप आहे. ख्रिस्तोफर नोलनच्या या चित्रपटाला आताच्या काळातील सर्वांत मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखलं जात आहे. 1930 आणि 40 च्या दशकात अणुबॉम्ब तयार करण्याचा अमेरिकेच्या गुप्त ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’वर या चित्रपटाची कथा आधारित आहे. शास्त्रज्ञ रॉबर्ट जे ओपनहायमर यांच्या नजरेतून ही कथा सांगितली जात आहे. ते अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जातात.

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित या चित्रपटात सिलियन मर्फी मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबतच एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, फ्लॉरेन्स पग, जोश हार्टनेस, केसी अफ्लेक, रामी मालेक आणि केनेथ ब्रनाघ यांच्याही भूमिका आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.