AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oscar 2024 : ‘ऑस्कर’च्या मंचावर नितिन देसाईंचे स्मरण ! निधनानंतर 7 महिन्यांनी ॲकॅडमीनं वाहिली श्रद्धांजली

ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची घोषणा 11 मार्च रोजी झाली. यावेळी ऑस्कर सोहळ्यादरम्यान अनेक दिवंगत कलाकारांचे स्मरण करण्यात आले. गेल्या वर्षी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 7 महिन्यांनी 'ऑस्कर'च्या मंचावर त्यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचवेळी नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Oscar 2024 : 'ऑस्कर'च्या मंचावर नितिन देसाईंचे स्मरण ! निधनानंतर 7 महिन्यांनी ॲकॅडमीनं वाहिली श्रद्धांजली
| Updated on: Mar 11, 2024 | 2:52 PM
Share

Oscar 2024 : 96 वा अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळा 11 मार्च रोजी लॉस एंजिलिसमधील ‘डॉल्बी थिएटर’मध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात कोण कोण बाजी मारणार याकडे जगभरातील कलाकारांचं आणि चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अनेक नामवंत कलाकारांना पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच यावेळी एक हृदय हेलावणारीही घटना घडते. या सोहळ्यात अनेक दिवंगत कलाकारांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचवेळी प्रसिद्ध आर्ट डिरेक्टर, दिवंगत नितीन देसाई यांनाही ट्रिब्यूट देण्यात आला, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

नितीन देसाई हे केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर जगातील एक मोठे नाव होते. मात्र, गेल्या वर्षी त्यांच्या निधनाने कला विश्वाला मोठा धक्का बसला. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे हिंदी चित्रपटसृष्टीवरच नव्हे तर संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली. ‘ऑस्कर’च्या मंचावरही त्यांचे स्मरण करण्यात आले. अकॅडमीच्या मंचावर मेमोरिअम नावाचा एक विशेष सेगमेंट सादर करण्यात आला. त्याच दरम्यान नितीन देसाई यांचे स्मरण करण्यात आले. चित्रपटांमधील त्यांच्या योगदानाला उजाळा देऊन त्यांना ट्रिब्यूट सादर करण्यात आला. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये नितीन देसाई यांचा फोटो स्क्रीनवर सादर करण्या आला. त्यांच्याशिवाय इतर कलाकारांचेही स्मरण करण्यात आले.

नितीन देसाई यांचा मृत्यू

सुमारे 7 महिन्यांपूर्वी, ऑगस्ट 2023 मध्ये नितीन देसाई यांचे निधन झाले. त्यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. खरंतर स्टुडिओच्या कामासाठी व इतर कामांसाठी नितीन देसाई यांनी कर्ज घेतले होते व ते त्या कर्जात बुडालेले होते. कर्जाची रक्कम वाढत गेल्याने व ते परत करण्याचा योग्य मार्ग सापडत नसल्याने निराश होऊन त्यांनी स्वत:चे आयुष्य संपवलं. ज्या स्टुडिओसाठी त्यांनी दिवसरात्र कष्ट केले, मेहनत केली, त्याच स्टुडिओमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नितीन देसाई प्रसिद्ध एन.डी स्टुडिओ हा सुमारे 43 एकर जागेत पसरला आहे. त्या स्टुडिओमध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुखसह अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा सलमान त्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचे शूटिंग करत होता, तेव्हा तो जवळपास 90 दिवस या स्टुडिओमध्ये राहिला होता. सलमानने त्या स्टुडिओमध्ये ‘वॉन्टेड’ आणि ‘बॉडीगार्ड’चे शूटिंगही केले. तसेच जोधा अकबर, यासह अनेक प्रसिद्ध चित्रपटही येथे शूट करण्यात आले होते.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.