AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aashram 3: ‘आश्रम 3’मध्ये हिंदुत्वाचा अपमान केल्याच्या आरोपांवर बॉबी म्हणाला, “यातून हेच सिद्ध होतं की..”

या सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनप्रमाणेच तिसऱ्या सिझनलाही बराच विरोध झाला. भोपाळमधील या सीरिजच्या सेटवर तोडफोडदेखील करण्यात आली होती. या सीरिजमध्ये दाखवलेल्या कथानकामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.

Aashram 3: 'आश्रम 3'मध्ये हिंदुत्वाचा अपमान केल्याच्या आरोपांवर बॉबी म्हणाला, यातून हेच सिद्ध होतं की..
Bobby DeolImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 26, 2022 | 12:30 PM
Share

एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 3 जून रोजी ‘आश्रम 3: एक बदनाम आश्रम’ (Aashram 3) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. बॉबी देओल, इशा गुप्ता, चंदन रॉय सन्याल, अनुप्रिया गोयंका, त्रिधा चौधरी, तुषार पांडे यांसारख्या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनप्रमाणेच तिसऱ्या सिझनलाही बराच विरोध झाला. भोपाळमधील या सीरिजच्या सेटवर तोडफोडदेखील करण्यात आली होती. या सीरिजमध्ये दाखवलेल्या कथानकामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांवर दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये व्यक्त झाले होते. आता अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉबी या सीरिजमध्ये ढोंगी बाबा निरालाची भूमिका साकारत आहे.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बॉबी म्हणाला, “मी इतकंच म्हणू शकतो की जर हा शो इतका चालला असेल तर नक्कीच लोकांनी तो पाहिला असेल. फक्त दोन ते तीन टक्के लोक असे असतील ज्यांना ही सीरिज आवडली नसेल. प्रत्येकाची आपापली वेगळी मतं असतात. आपण एखाद्या व्यक्तीला त्याची मतं मांडण्यापासून रोखू शकत नाही. तुम्ही जर या सीरिजचा यश पाहिला तर त्यातून हेच सिद्ध होतं की सीरिजमध्ये काहीच चुकीचं नाही.”

View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

याआधी ‘झूम डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा म्हणाले होते, “भारतात धर्माविषयी खूप चांगली ओळ म्हटली जाते. माणूस धर्माला नाही वाचवू शकत, धर्म माणसाला वाचवतो. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की आपण धर्माला वाचवत आहोत, तो त्यांचा गोड गैरसमज आहे.” आश्रम या सीरिजच्या तीन यशस्वी सिझननंतर आता चौथा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चौथ्या सिझनचा टीझरसुद्धा प्रदर्शित झाला आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.