Aashram 3: बॉबी देओलने सांगितला ‘आश्रम 3’मधला इंटिमेट सीन शूट करतानाचा अनुभव

इशाने यामध्ये सोनियाची भूमिका साकारली आहे. सीरिजमध्ये इशा आणि बॉबी (Bobby Deol) यांचे काही इंटिमेट सीन्ससुद्धा आहेत. हे सीन शूट करतानाचा अनुभव बॉबीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.

Aashram 3: बॉबी देओलने सांगितला 'आश्रम 3'मधला इंटिमेट सीन शूट करतानाचा अनुभव
Aashram 3 Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 10:54 AM

पहिल्या दोन सिझननंतर आता ‘आश्रम’ (Aashram 3) या वेब सीरिजचा तिसरा सिझनसुद्धा ओटीटीवर यशस्वी ठरला आहे. अभिनेता बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. बॉबीच्या अभिनयकौशल्यावरही प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. यंदाच्या सिझनमध्ये बॉबी देओल (बाबा निराला), चंदन रॉय सन्याल (भोपा) आणि अदिती पोहणकर (पम्मी) यांच्याशिवाय अभिनेत्री इशा गुप्ताने (Esha Gupta) प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. इशाने यामध्ये सोनियाची भूमिका साकारली आहे. सीरिजमध्ये इशा आणि बॉबी (Bobby Deol) यांचे काही इंटिमेट सीन्ससुद्धा आहेत. हे सीन शूट करतानाचा अनुभव बॉबीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.

‘स्पॉटबॉय ई’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी म्हणाला, “पहिल्यांदा जेव्हा मी इंटिमेट सीन शूट केला, तेव्हा मी अस्वस्थ होतो. मी पहिल्यांदाच असं काहीतरी करत होतो. माझी सहकलाकार अत्यंत प्रोफेशनल होती. ती तिच्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करत होती. तिच्यामुळेच सीन शूट करणं सोपं झालं. प्रकाश झा यांनी चांगल्याप्रकारे सीन शूट केले होते आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीने सर्वकाही शक्य झालं.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या मुलाखतीत इशानेसुद्धा तिचा अनुभव सांगितला. “इंडस्ट्रीत जवळपास दहा वर्षे काम केल्यानंतर कम्फर्टेबल किंवा अनकम्फर्टेबल असं काही नसतं. लोकांना इंटिमसी म्हणजे एक समस्या वाटते, पण असं नाहीये. फक्त तुमच्या खऱ्या आयुष्यात त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या नाही पाहिजेत. तसं पाहिल्यास, प्रत्येक सीन कठीण असतो. मग तो रडण्याचा असो किंवा मग गाडी चालवण्याचा सीन असो. इंटिमेट सीन पहिल्यांदा शूट करताना मला खूप अवघड वाटलं होतं. पण जर तुम्ही चांगल्या कलाकारासोबत काम करत असाल, तर तुम्हाला कोणतीच समस्या जाणवणार नाही”, असं ती म्हणाली.

एमएक्स प्लेअरवर 3 जूनपासून आश्रमचा तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. ‘आश्रम 3’मध्ये अदिती पोहणकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन, श्रिधा चौधरी यांच्याही भूमिका आहेत. यामध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका साकारली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.